shiv sena symbol: शिवसेना कुणाची? ECI सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sen symbol hearing in election commission : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकरणाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलेलं आहे. खरी शिवसेना कुणाची? (Real Shiv Sena) धनुष्यबाण (bow and arrow) निवडणूक चिन्ह (election symbol) कुणाला मिळणार? या प्रश्नांची उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगात (election commission of india) मिळणार असून, आज (20 जानेवारी) या प्रकरणी सुनावणी होत आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून (Shinde Faction) करण्यात आलेल्या युक्तिवादाबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) हे पुन्हा एकदा कायदेशीर लढाई लढताना दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने आमचा गट खरी शिवसेना असल्याचा दावा केलेला आहे. त्याला ठाकरे गटाकडून आव्हान दिलं गेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने संमती दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू झालेली असून, यापूर्वीच्या दोन सुनावण्यांमध्ये दोन्ही गटांकडून (ठाकरे गट आणि शिंदे गट) काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह सुनावणी; आतापर्यंत काय झाले युक्तिवाद?

पहिल्या सुनावणीत शिंदे गटाने आपल्या बाजूने बहुमत असल्याचं म्हटलेलं होतं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी चुकीच्या मार्गाने शिवसेनेच्या घटनेत बदल केला असल्याचंही म्हटलेलं आहे.

हे वाचलं का?

17 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाने शिंदे गटाचे दावे फेटाळताना काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेत मुख्यनेता पद नसल्याचंही म्हटलेलं आहे. दुसरी बाब म्हणजे शिंदे गटाकडून दाखवण्यात आलेल्या 7 जिल्हाप्रमुखांबद्दलही आक्षेप घेतलेले आहे.

गेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाने म्हणणं मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. त्यामुळे आयोगाने वेळ वाढवून देताना आज सुनावणी ठेवली आहे. ठाकरे गटाच्या युक्तिवादानंतर शिंदे गटालाही संधी दिली जाईल. त्यामुळे शिंदे गट काय भूमिका मांडणार हेही महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

शिवसेना सुनावणी : तीन सदस्यीय पीठात कोण-कोण?

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील मुख्यालयात शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप पांडे व अरुण गोयल या तीन सदस्यीय पीठापुढे सुनावणी होत आहे.

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापर्यंत निर्णय न घेण्याची ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

गेल्यावेळी (17 जानेवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. “एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या विधानसभा सदस्यत्वाच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत कोणतीही सुनावणी घेऊ नये किंवा निर्णय करू नये. सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात सोळा आमदार अपात्र ठरवले तर निवडणूक आयोगाचे हसे होईल”, असं ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT