शिवभोजन थाळी 14 जून 2021 पर्यंत मोफत!, म्हणजे लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ?
मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाने थोड्याच वेळापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, 14 जून 2021 पर्यंत महाराष्ट्रात शिवभोजन थाळी ही मोफत मिळणार आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी साधारण एप्रिल महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी गरीबांचे हाल होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने मोफत शिवभोजन […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाने थोड्याच वेळापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, 14 जून 2021 पर्यंत महाराष्ट्रात शिवभोजन थाळी ही मोफत मिळणार आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी साधारण एप्रिल महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी गरीबांचे हाल होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने मोफत शिवभोजन थाळी सुरु केली आहे. त्याची मदत आता आणखी वाढविण्यात आली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गरीबांसाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली होती. सुरुवातीला ही थाळी 10 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान याची किंमत अवघी 5 रुपये करण्यात आली होती. दरम्यान, यंदाचा लॉकडाऊन जाहीर करताना गरीबांची ससेहोलपट होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी ही मोफत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. आता याच निर्णयात आणखी वाढ करण्यात आली.
शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 21, 2021
मात्र, या निर्णयानंतर राज्यात मात्र एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन लवकरात लवकर हटविण्यात यावा आणि सारं काही पुन्हा एकदा सुरळीत व्हावं अशीच सर्वांची इच्छा आहे. मात्र, असं असलं तरीही ज्या अर्थी शिवभोजन थाळी आणखी १५ दिवस मोफत देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ते लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने आता सरकार लॉकडाऊन देखील 14 जूनपर्यंत वाढवणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी 14 एप्रिलपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाला. तो आधी 1 मेपर्यंत होता. त्यानंतर तो 15 मे आणि नंतर 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. अशात आता 1 जूनच्या पुढेही महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता वाटत आहे.










