शिवचरित्र प्रत्येकाच्या मनात पोहचलं ते फक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळेच-राज ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आशा भोसले यांच्या हस्ते पुण्यात भव्य सत्कार सोहळा झाला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे, इतिहासकार गजानन मेहेंदळे आणि भाजप आमदार आशिष शेलार हे उपस्थित होते.यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहास जपत असतानाच वर्तमान जपणारे महापुरूष असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

1995-96 हे वर्ष असेल तेव्हा ही जागा शिवसृष्टीसाठी देण्यात आली होती. त्यावेळी इथे काही नसायची. या शिवसृष्टीमध्ये येत असतानाच मला बाबासाहेब पुरंदरे यांनी 1974 मध्ये शिवतीर्थावर साकारली होती त्याची आठवण आली. मी त्या शिवसृष्टीमध्ये जात असे आणि राज्याभिषेक सोहळा मी रोज बघायचो. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मी बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वागताला आलो होतो. तेव्हा मी सर्वप्रथम त्यांना पाहिलं. त्यानंतर माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकलो. त्यावेळी महाराजांच्या भूमिकेत स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी काम केलं होतं. मी ते देखील पाहिलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आशा भोसलेंना कोण म्हणेल की त्या ८८ वर्षांच्या आहेत.. तेव्हा आशाताई चटकन म्हणाल्या की कशाला जाहीर करता? आणि मग एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

बाबासाहेब पुरंदरे यांना मी विविधवेळा भेटलो आहे. अनेक विषय समजून घेतले आहेत. मी जेव्हा वाढदिवसाच्या दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांना भेटलो त्यानंतर मला काही पत्रकार भेटले होते. मी त्यांना सांगितलं की जसा इतिहास सांगतात आणि वर्तमानावर भानावर आणतात ते फार महत्त्वाचं आहे. बाबासाहेब पुरंदरे ज्या पद्धतीने आपल्याला इतिहास सांगतात तसा तो प्रसंग पूर्णपणे आपल्या डोक्यात फिट बसतो असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मला एक प्रसंग आठवतो आहे की कारभार ऐसे करणे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे याबाबत त्यांचं व्याख्यान आणि त्यानंतर इतिहासासोबत ते वर्तमानही आणतात. इतिहासातून ते काहीतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तो आपण समजून घेतला नाही तर तो फक्त इतिहास उरतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकदा मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा चा प्रसंग आठवतो की तलवारी स्वच्छ करत होते बाबासाहेब पुरंदरे. मला त्यांनी त्या तलवारींचं वजन, त्याला छीद्र का असतात? हे सगळं सविस्तर समजावून सांगतिलं.

बाबासाहेब पुरंदरे इतिहास तुम्हाला समजेल, रूचेल, आवडेल असं तुम्हाला सांगतात. इतिहास कसा बघावा हे बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे पाहून कळतं असंही बाबासाहेब पुरंदरे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या भाषणात, पुस्तकांमध्ये, व्याख्यानांमध्ये इतिहास कधीही सोडला नाही. जी अलंकारिक भाषा त्यांनी वापरली आहे ती वापरली नसती तर आपल्याला त्या प्रसंगाची खोली कळलीच नसती असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. देवगिरी किल्ल्यात मोगलांना शिरणं किती कठीण होतं तर सीतेच्या हृदयात रावणाला शिरणं जितकं कठीण होतं तितकं कठीण होतं. हे उदाहरण बाबासाहेब पुरंदरेच लिहू शकतात आणि आपल्या डोक्यात तो इतिहास पोहचवू शकतात. इतिहास घराघरात पोहचवला तो बाबासाहेब पुरंदरे यांनीच असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT