पाणी कुठेतरी मुरतंय ! वाझे प्रकरणात मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतरही विरोधीपक्ष नेते सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. भाजपने आज शिवसेनेवर चौफेर हल्लाबोल केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना वसुलीसाठी माणूस हवा होता म्हणून वाझेंना संधी देण्यात आली असं म्हटलं. भाजपचा सहयोगी पक्ष शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायम मेटे यांनीही आज सचिन वाझे प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. […]
ADVERTISEMENT
सचिन वाझे यांना NIA ने अटक केल्यानंतरही विरोधीपक्ष नेते सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. भाजपने आज शिवसेनेवर चौफेर हल्लाबोल केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना वसुलीसाठी माणूस हवा होता म्हणून वाझेंना संधी देण्यात आली असं म्हटलं. भाजपचा सहयोगी पक्ष शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायम मेटे यांनीही आज सचिन वाझे प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
16 वर्ष निलंबन.. तरीही सचिन वाझे का आणि कसे परतलेले मुंबई पोलिसात?
“सरकार एका गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री एका पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी किती आगतिक होतात हे आपण विधानसभेमध्ये पाहिलं आहे. याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय असाच होतो. हे सरकार गुन्हेगाराला वाचवण्याचं काम करत आहे”, अशा शब्दांमध्ये मेटे यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. ते बारामतीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
हे वाचलं का?
वाझेंना अटक – सुनावणीदरम्यान NIA कोर्टात काय घडलं? वाचा सविस्तर..
दरम्यान, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुण्यात बोलत असताना, उद्धव ठाकरेंना वसुलीसाठी माणूस हवा होता म्हणून वाझेंना पुन्हा संधी मिळाली असा गंभीर आरोप केला आहे. २००३ साली ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. यानंतर २००७ साली वाझेंची Review Petition ही कोर्टाने रिजेक्ट केली होती.
ADVERTISEMENT
सचिन वाझेंनी IPL बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली – नितेश राणे
ADVERTISEMENT
“मग अशावेळी २०२० मध्ये असं काय झालं की सचिन वाझेंना राज्य सरकारला पुन्हा सेवेत घ्यावसं वाटलं. जे मुख्यमंत्री कोरोनाच्या काळात घराबाहेर पडत नव्हते त्यांनी कोरोनाचं कारण देऊन विशेष समिती नेमली आणि वाझेंना पुन्हा सेवेत दाखल करुन घेतलं. उद्धव ठाकरेंना वसुली करण्यासाठी एक माणूस हवा होता. सचिन वाझे हा त्यांच्या विश्वासातला होता, शिवसैनिक होता. वाझे काही कोटींची खंडणी सहज वसूल करु शकतो. याच एका कारणासाठी सचिन वाझेला पुन्हा संधी देण्यात आली असावी, यापेक्षा दुसरं कारण काय असु शकतं?” किरीट सोमय्यांनी राज्य सरकारविरोधात घणाघाती आरोप केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT