Uddhav Thackeray : मोदी आले तरी ‘बाळासाहेबांशिवाय’ मतं मिळू शकत नाहीत!
Uddhav Thackeray on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary : मुंबई : महाराष्ट्रात कोणी, कितीही आले अगदी मोदी आले तरी त्यांनाही कळून चुकलं आहे की, महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मिळू शकतं नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजप […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary :
मुंबई : महाराष्ट्रात कोणी, कितीही आले अगदी मोदी आले तरी त्यांनाही कळून चुकलं आहे की, महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाशिवाय मत मिळू शकतं नाहीत. हिंमत असेल तर तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा फोटो घेऊन येतो. बघा कोण जिंकतं? असं म्हणतं उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला थेट आव्हान दिलं. ते आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते. (Uddhav Thackeray on the occasion of balasaheb Thackeray birth anniversary)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको :
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आज मला अमेरिकेचे अध्यक्ष भेटले, काळजीत होते. मला म्हणाले मी मुद्दाम आलो आहे, कारण उद्या मी भाजपात चाललो आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घरावर एफबीआयने रेड टाकली, तेव्हा काही खोकेवाले त्यांना बोलले, तू असा कसा? भाजपमध्ये किंवा मिंधे गटात ये, त्यानंतर नीट झोप लागेल. त्यामुळे उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गट किंवा भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे :
भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु असल्याचा आरोप यावेळी ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो. एक दुभाषी आमच्यासोबत होता. काही दिवसांमध्ये तिथं ऑलिम्पिक होणार होतं. त्यामुळे मी त्याला तु बिजिंगमध्ये जा, तुला आणखी चांगले पैसे मिळतील.