उद्धव ठाकरेंप्रमाणे मी हिंदुत्ववादी आहे, असं पंतप्रधान संसदेत म्हणतील का? ; भास्कर जाधवांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रत्नागिरी: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला धक्का बसला आहे. पक्षनेतृत्व खडबडून जागे झाले आहे. त्यामुळे एकाबाजूने उद्धव ठाकरे पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरले आहेत तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना साद घालताना दिसत आहेत. आज रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. यामध्ये यावेळी माजी खासदार अनंत गीते, उपनेते राजन साळवी, आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. यावेळी भास्कर जाधवांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे. हिंतुत्वावरूनही भाजपला टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री असताना विधानसभेत जाहीरपणे मी हिंदुत्ववादी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. पार्लमेंटमध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी ही हिंमत दाखवतील का? असा सवाल भास्कर जाधवांनी यावेळी विचारला आहे. पुढे भास्कर जाधव म्हणाले “ज्या शिवसेनेला भाजप महाराष्ट्रात आम्ही लहान भाऊ आणि केंद्रात सेना लहान भाऊ असे म्हटले त्याच भाजपने शिवसेना प्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाने राजीनामा दिल्यानंतर एकमेकांना पेढे भरवले.”

अनेकदा सरकार पडेल अश्या प्रतिक्रिया आल्या पण सरकार पडले नाही. ईडीच्या कारवाया झाल्या तरीही सरकार पडले नाही, मंत्री जेलमध्ये टाकले तरी सरकार पडलं नाही. त्यानंतर भाजपने रडीचा डाव खेळत आमदार फोडले. बंडामध्ये आमचा काही संबध नसल्याचे सांगणाऱ्या भाजपने प्रत्यक्ष बंडखोरांना कशी मदत केली याचा पाढा स्वतः एकनाथ शिंदेंनी वाचल्याच्या दाखला देत भास्कर जाधवांनी भाजपवरती टीका केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना रोज मेळावे, सभा घेत आहे. आज उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. त्याचबरोबर आपल्या १५ आमदारांना भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. भास्करजाधव यांना शिवसेनेची धगधगती तोफ म्हटले जाते. त्यांनी नुकत्याच झालेल्या विशेष अधिवेशनात बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT