वाद शिवसेना-राष्ट्रवादीचा ! शशिकांत शिंदेना शह देण्यासाठी शिवसेनेच्या होर्डिंगवर थेट मोदींची एन्ट्री

इम्तियाज मुजावर

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, एकमेकांचे वैचारिक विरोधक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत आहे. परंतू स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मात्र या महाविकास आघाडीची बीज रोवली जाताना दिसत नाहीये. साताऱ्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात एक वेगळंच नाट्य पहायला मिळालं. राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदेंना शह देण्यासाठी खटाव-कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, एकमेकांचे वैचारिक विरोधक असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेत आहे. परंतू स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये मात्र या महाविकास आघाडीची बीज रोवली जाताना दिसत नाहीये. साताऱ्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादात एक वेगळंच नाट्य पहायला मिळालं.

राष्ट्रवादीचे माजी आमदार शशिकांत शिंदेंना शह देण्यासाठी खटाव-कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार महेंश शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना होर्डिंगवर स्थान दिलं आहे.

जाणून घ्या, काय आहे वाद?

साता जिल्ह्यातील खटाव हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील लोकांसाठी महत्वाची मानली जाणारी जिहे-कठापूर पाणी योजना ही गेली २६ वर्ष रखडली होती. या योजनेचं काम अत्यंत धीम्या गतीने सुरु होतं. परंतू २६ वर्षांनी या योजनानुसार नेर तलावात पाणी आल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी ही पाणी योजना अत्यंत महत्वाची मानली जाते.