Rahul Shewale : कोरोनात इतरांसारखी ‘त्या’ महिलेलाही मदत केली अन् तिच्या अपेक्षा वाढल्या
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गटनेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावरील आरोपांना आज (रविवारी) पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. राहुल शेवाळेंविरोधात एका महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही हा मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनिषा कायंदे आणि अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे […]
ADVERTISEMENT
मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे गटनेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावरील आरोपांना आज (रविवारी) पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. राहुल शेवाळेंविरोधात एका महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही हा मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार मनिषा कायंदे आणि अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे सरकारला चौकशीचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे बोलत होते.
ADVERTISEMENT
याबाबत बोलताना शेवाळे म्हणाले, संबंधित महिलेला दुबईतील मित्राच्या सांगण्यावरुन कोरोना काळात मदत केली. कोरोना काळात ती महिला भारतात अडकून पडली होती, त्यावेळी आर्थिक चणचणीमुळे तिला मदत केली होती. त्यानंतर मात्र त्या महिलेच्या अपेक्षा वाढतं गेल्या. त्यामुळे ती मदत थांबवली. मदत थांबविल्यानंतर तिनं ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. ती दुबईहून मला ब्लॅकमेल करायची. मला आणि माझ्या पत्नीला धमकी देण्यात आली, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित महिलेचे क्रिमिनल बॅकग्राऊंड :
संबंधित महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावाही शेवाळी यांनी केला. ते म्हणाले, संबंधित महिलेची आई दिल्लीत कॅब्रे डान्सर आहे. वडिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याची माहिती दिल्ली पोलिसांकडे आहे. एक भाऊ बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात आहे. तर एक भाऊ ड्रग पेडलर आहे. त्या महिलेची बहिण माहिमध्ये बारचं काम बघते. माझ्या उत्तरला दिल्ली पोलिसांनीही दुजोरा दिला, असं ते म्हणाले.
हे वाचलं का?
त्या महिलेचे पाकिस्तानशी संबंध :
दरम्यान, त्या महिलेचे पाकिस्तानशीही संबंध असल्याचा खळबजनक दावाही शेवाळे यांनी केला आहे. ते म्हणाले, ही फॅशन डिझायनर महिला दाऊद गँगसोबत काम करत आहे. या महिलेचा पाकिस्तानी ग्रुप आहे. त्यांच्या गँगमध्ये ‘फराह’ नावाची पाकिस्तानी महिला आहे. तसंच राशीद नावाचा पाकिस्तानी एजंटही आहे. रईस आणि जावेद छोटाली नावाच्या व्यक्तींसोबत ती काम करते. हे साधंसुधं प्रकरण नाही हा आंतरराष्ट्रीय कट आहे, असं शेवाळे म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाची एनआयए चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेना-राष्ट्रवादीची फूस :
सदर महिलेला शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीची फूस असल्याचा आरोपही शेवाळी यांनी केला. ते म्हणाले, पाकिस्तानी एजंटच्या मदतीने तिने फेक अकाऊंट चालवलं. तिला ट्विटरवर युवासेना फॉलो करत होती. माझ्यावर आरोप कर म्हणून सांगायचे. तसंच ती मुंबई पोलिसांना सापडत नाही. तिच्या पत्त्यावर पोलीस जाऊन आले. पण ती सापडत नाही. राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला मात्र ती सापडली. ती राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला कशी सापडली? असा सवाल त्यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT