उद्धव ठाकरे ‘सत्यवादी’, Pooja Chavan ला न्याय मिळणारच-संजय राऊत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत, मी त्यांना ‘मिस्टर सत्यवादी’ म्हणतो. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणार असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात तपास सुरू आहे. भाजपकडून आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून काही आरोपही केले जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते कधीही कुणावर अन्याय होऊ देणार […]
ADVERTISEMENT
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत, मी त्यांना ‘मिस्टर सत्यवादी’ म्हणतो. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणार असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात तपास सुरू आहे. भाजपकडून आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडून काही आरोपही केले जात आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते कधीही कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्लं असतं. खुर्ची इतकी महत्त्वाची झाली आहे का? उद्धव ठाकरे तुम्ही संवेदनशील आहात योग्य निर्णय घ्याल असं चित्रा वाघ म्हणाल्या. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने पुण्यात ७ फेब्रुवारीच्या रात्री आत्महत्या केली. त्यानंतर दोन दिवसांनी १२ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर भाजपने दुसरा आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला. त्यानंतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याची सुरू केली. भाजपच्या चित्रा वाघ या गेल्या तीन ते चार दिवसांपासून संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. संजय राठोड हे पंधरा दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते २३ फेब्रुवारीला पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. तिथे मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं. ज्यामुळे कोरोना नियमांचं उल्लंघन झालं. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्रीही नाराज झाले.
ADVERTISEMENT
आज पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी आणखी काही आरोप केले आहेत. या आरोपांबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. ते या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाहीत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT