क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय?-संजय राऊत
क्रांती रेडकर ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या आऱोपांबाबत बोलते आहे. नवाब मलिक गुंडागर्दी करून माझ्या नवऱ्याला खुर्चीवरून खाली खेचू पाहात आहेत असाही आरोप क्रांती रेडकरने केला आहे. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला […]
ADVERTISEMENT

क्रांती रेडकर ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या आऱोपांबाबत बोलते आहे. नवाब मलिक गुंडागर्दी करून माझ्या नवऱ्याला खुर्चीवरून खाली खेचू पाहात आहेत असाही आरोप क्रांती रेडकरने केला आहे. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. क्रांती रेडकरचा एनसीबीच्या प्रकरणाशी संबंध काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
‘एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का? क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही.’









