धक्कादायक ! नागपूरच्या क्वेटा कॉलनीत सापडली ५ मृत अर्भक, पोलिसांकडून तपास सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. लकडगंज परिसरातील क्वेटा कॉलनी भागात मोकळ्या मैदानाच्या कंपाऊंड वॉलच्या बाजूला ५ मृत अर्भक सापडली आहेत. भिंतीच्या जवळील कचऱ्यात ही अर्भक आढळून आल्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

स्थानिक नागरिकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. लकडगंज भागातील KT वाईन शॉपच्या समोर हा प्रकार घडला आहे. ही माहिती कळताच या परिसरात बघ्यांची गर्दीही वाढायला लागली. या अर्भकांशेजारी काही औषधांचे बॉक्सही पोलिसांना सापडले आहेत.

हे वाचलं का?

पुण्यातील संतापजनक घटना! नराधम बापाचा १४ वर्षाच्या लेकीवर बलात्कार

नागपूर पोलिसांचे डीसीपी गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी बायो मेडीकल वेस्टही सापडलं आहे. सापडलेल्या अर्भकांपैकी काही अर्भक ही डेव्हलप झालेली होती. त्या भागात पोलिसांना किडनी, हाडही सापडली आहेत. त्यामुळे वैद्यकीय टीम या भागात तपासणी करत असून आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सर्व प्रकार कोणी केला याचा तपास करणार असल्याचं राजमाने यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार सापडलेल्या अर्भकांपैकी बहुतांश अर्भक ही मुलींची आहेत. बेवारस पद्धतीने सापडलेली अर्भक आणि त्याशेजारी असलेले औषधांचे बॉक्स यामुळे जवळपासच कुठेतरी अवैधरित्या गर्भपात केंद्र किंवा सोनोग्राफी केंद्र चालवलं जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर फॉरेन्सिक विभागाचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. परंतू या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT