धक्कादायक! दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झाली मुलगी, मृतदेह पुरलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ
स्मिता शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या 17 वर्षांच्या मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे. जुन्नरच्या आंबेगाव तालुक्यातील नाव्हेड गावातील आदिवासी मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. सखुबाई शंकर घोडे असं मृत मुलीचं नाव आहे. मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणाचा आम्ही कसून शोध घेत आहोत असं […]
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर
दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या 17 वर्षांच्या मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे. जुन्नरच्या आंबेगाव तालुक्यातील नाव्हेड गावातील आदिवासी मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे. सखुबाई शंकर घोडे असं मृत मुलीचं नाव आहे. मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणाचा आम्ही कसून शोध घेत आहोत असं पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितलं आहे.
दोन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलगीने आत्महत्या केली असावी म्हणून मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार घोडेगाव पोलीसांत दिली. त्यानुसार घोडेगाव पोलिसांकडून बेपत्ता महिला मुली, नागरिकांची शोध मोहिम कार्यक्रम सुरु असताना दोन वर्षापुर्वी रहात्या घरातून बेपत्ता झालेल्या सखुबाई शंकर घोडे (वय १७ वर्ष) या मुलीचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांना नोव्हड येथील घोडनदी पात्रालगत तिचा मृतदेह गाडल्याची माहिती घोडेगाव पोलीसांना मिळाली.