Shubhangi Patil म्हणाल्या, ‘मी शब्दाला पक्की असते’, अन् केला ‘या’ पक्षात प्रवेश
Shubhangi Patil joined Shiv Sena UBT party: मुंबई: ‘मी शब्दाला पक्की असते. कारण मी दिलेला शब्द हा सामान्य घरातील लेकीचा असतो.’ असं म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबेंविरोधात (Satyajeet Tambe) निवडणूक लढलेल्या शुभांगी पाटील (Shibhangi Patil) यांनी आज (4 फेब्रुवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) (Shiv sena UBT) पक्षात प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’वर […]
ADVERTISEMENT
Shubhangi Patil joined Shiv Sena UBT party: मुंबई: ‘मी शब्दाला पक्की असते. कारण मी दिलेला शब्द हा सामान्य घरातील लेकीचा असतो.’ असं म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबेंविरोधात (Satyajeet Tambe) निवडणूक लढलेल्या शुभांगी पाटील (Shibhangi Patil) यांनी आज (4 फेब्रुवारी) शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) (Shiv sena UBT) पक्षात प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’वर येऊन शुभांगी पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती बांधत जाहीर प्रवेश केला. (shubhangi patil who contested against satyajeet tambe in nashik graduate constituency joined shiv sena ubt party)
ADVERTISEMENT
पाहा ठाकरे गटात प्रवेश केल्यावर शुभांगी पाटील नेमकं काय म्हणाल्या:
‘मला उद्धव साहेब एकच म्हणाले की, तुझं खरं अभिनंदन केलं पाहिजे. शुभांगी ताई तुम्हाला एवढं मतदान मिळणं… 40 हजार मतदान मला मिळालं. तर 9000 मतदान बाद झालं. एवढं मतदान सामान्य घरातील मुलीला मिळणं हे फार मोठं आहे. जनतेचा यामध्ये विजय आहे. मी हरलेली नाहीत. तुम्हीही खचून जाऊ नका. आता लढाई सुरू झालेली आहे.’
‘मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. मी आज साहेबांची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले त्यानंतर शिवबंधनही बांधलं. कारण मी शब्दाला पक्की असते. शब्द देते कारण सामान्य घरातील लेकीचा, सामान्य जनतेचा शब्द होता. तो शब्द पुढे न्यायचं आहे.’
Satyjeet Tambe : ‘मविआ’चा ‘करेक्ट कार्यक्रम’; शुभांगी पाटलांच्या पदरी मोठा पराभव
हे वाचलं का?
‘यापुढे माझ्यावर जी जबाबदारी दिली ती मी आनंदाने स्वीकारेल आणि शिवसेनासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन. जो शासन जीआर बाकी आहे विना-अनुदानित, जुन्या पेन्शनचा संदर्भात त्या प्रश्नाविषयी आंदोलन करेन. उत्तर महाराष्ट्र तर पिंजून काढेलच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकापर्यंत पोहचण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.’
‘महाविकास आघाडीने पूर्ण प्रचार केला. ते माझ्यासोबतच होते. आमचे शिवसैनिक माझ्यासोबतच होते. नाना पटोले, जयंत पाटील या सगळ्यांचं नाव घेतलं पाहिजे. नाना पटोलेंनी तर दोन ठिकाणी सभाही घेतल्या माझ्यासाठी. हे फार विशेष आहे माझ्यासाठी.’ असं म्हणत शुभांगी पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत समाधानही व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
कोण आहेत शुभांगी पाटील?
ADVERTISEMENT
-
शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए.बीएड आणि एल एल बी शिक्षण पूर्ण केलं आहे.
पाटील या सध्या धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
त्याशिवाय महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या त्या राज्याध्यक्ष आहेत.
पाटील महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत.
तसेच पाटील महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागारही आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत.
याशिवाय शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
विधान परिषद 2023: मी नॉट रिचेबल का होते ते वेळ आल्यावर..: शुभांगी पाटील
शुभांगी पाटील मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या:
-
आता शिवसेना (UBT) पक्षात प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील या मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. राष्ट्रवादीत असताना त्या राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष होत्या. काही काळ राष्ट्रवादीसोबत काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटना स्थापन केली आणि त्यामाध्यमातून काम सुरु केलं होतं.
-
पुढे 21 सप्टेंबर 2022 रोजी शुभांगी पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. नाशिक पदवीधरसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्या आग्रही होत्या. मात्र भाजपने एबी फॉर्मसाठी त्यांचा विचार न केल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर देखील त्या भाजपचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या.
-
मात्र, भाजप अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचं चित्र आहे, हे ओळखून त्यांनी तात्काळ ‘मातोश्री’सोबत संपर्क साधला. त्यानंतर ‘मातोश्री’वरुनही त्यांना पाठिंबा देण्यात आला. या निवडणुकीत त्यांनी सत्यजीत तांबे यांना कडवी टक्करही दिली. मात्र, सत्यजीत तांबे यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर आणि भाजपच्या पाठिंब्यावर पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT