नागपुरातील सिग्नल दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद राहणार, नेमकं कारण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, नागपूर: नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सिग्नलवर थांबून उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. यासाठीच नागपूर पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय आज घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांना तसेच वाहतूक पोलिसांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT

नागपूर शहरातील वाढत तापमान लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी 21 चौकांमधील सिग्नल हे दुपारी 12 ते 4 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या उन्हाचा तापमानाचा पारा सरासरी 45 अंशावर जाऊन पोहचला असून सूर्यनारायण जणू आग ओकत असल्याने प्रचंड चटके नागपूरकरांना सहन करावे लागते आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी ज्या याठिकाणी फारशी गर्दी नसते आणि सिग्नल बंद असले तरी वाहतूक कोंडी होणार नाही असे 21 सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

यामध्ये काचीपुरा, बजाज नगर, लक्ष्मी नगर, माता कचेरी, कन्नमवार चौक, आकाशवाणी चौक, जीपीओ चौक, सायन्स कॉलेज चौक, अहिंसा चौक, आग्याराम देवी चौक, सरदार पटेल चौक, वैद्यनाथ चौक, मनपा झोन 4 ऑफिस, नरेंद्रनगर, कडबी चौक,10 नंबर पुलिया, भीम चौक, जपानी गार्डन, पोलीस तलाव, राठोड लॉन चौकवरील सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे.

नागपूरसह विदर्भात अतिउष्णतेची लाट

ADVERTISEMENT

एप्रिल महिना सुरू होण्यापूर्वीच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलं होतं. तर मे महिना सुरु होताच तापमानाचा आकडा अधिकच वाढला आहे.

ADVERTISEMENT

केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. नागपूरसह विदर्भात अक्षरशः सूर्य तळपायला सुरुवात झाल्याने मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.

राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात उष्णतेची लाट आली असल्याची माहिती हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ नागपूर आणि विदर्भातचं नाही तर संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा वर चढलेला दिसून येत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचे तापमान हे चाळीस अंशाच्या वर पोहोचले आहे.

उन्हात काम करून शेतकऱ्याने पाण्याचा घोट घेताच मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादमध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याला त्याचा प्राण गमवावा लागला होता. भर दुपारी शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला उन्हाचा तडाखा बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील हासेगाव केज या ठिकाणी हा शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. उन बरंच लागल्याने त्याने पाण्याचा घोट घेतला आणि त्यानंतर लगेचच त्याला चक्कर आली होती.

मुंबईसह कोकणाला उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून ऑरेंट अलर्ट

लिंबराज सुकाळे (वय 50 वर्ष) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतातील कडबा बांधून झाल्यावर तहान लागल्याने गडबडीत पाणी प्यायल्यानंतर या शेतकऱ्याला उष्माघाताचा झटका बसला होता. उपचारासाठी कळंबमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी घोषित केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT