Sanjay Rathod यांच्यावर महिलेने केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणार SIT
महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि शरीरसुखाची मागणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी संजय राठोड यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. मात्र आता हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी तातडीने एक एसआयटी अर्थात स्पेशल टास्क फोर्स तयार केली आहे. या कमिटीमध्ये […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण आणि शरीरसुखाची मागणी केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी संजय राठोड यांनी सगळे आरोप फेटाळले आहेत. मात्र आता हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी तातडीने एक एसआयटी अर्थात स्पेशल टास्क फोर्स तयार केली आहे. या कमिटीमध्ये एस. पी., एल सीबी ठाणे, अवधुवाडीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि महिला सेलच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही कमिटी तक्रारदार महिलेच्या गावात तिचा जबाब नोंदवणार आहेत.
काय आहे प्रकरण?
पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाले आणि त्यांना वनमंत्री पद सोडावं लागलं. आता त्यामध्ये आणखी एका आरोपाची भर पडली आहे. एका महिलेने पत्र पाठवून संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार केली आहे. तसंच संजय राठोड हे लैंगिक छळ करत असल्याचंही म्हटलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
चित्रा वाघ यांनी काय म्हटलं आहे?
शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही तसंच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीर सुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो असंही या तक्रारीत म्हटलं आहे
ADVERTISEMENT
पोलिसांचं म्हणणं काय?
ADVERTISEMENT
एक रजिस्टर पोस्टाने पोलीस स्टेशन घाटंजी येथे निनावी पत्राद्वारे अर्ज आला आहे त्यात चौकशी करून सदर अर्ज संबंधाने पुढील कारवाही करू वरिष्ठांच्या मार्गदर्शनात योग्य ती कारवाई करू आणि ज्यांच्या विरोधात तक्रार आहे ते नाव घेण्याचे पोलिसांनी टाळले आहे मात्र अर्ज महिलेचा आहे असे घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन कराळे यांनी सांगितले आहे.
मात्र आता याप्रकरणी पोलिसांनी एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. हे तपास पथक सदर महिलेच्या गावात जाऊन तिचा जबाब नोंदवणार आहे.
संजय राठोड यांनी या प्रकरणी काय म्हटलं आहे?
माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा प्रयत्न आहे. गेल्या काही दिवसांपासून मला अननोन नंबर वरून मेसेज येत आहेत. तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू, मुंबईत तुमच्या विरोधात ही तक्रार दाखल करू, ती तक्रार दाखल करू असं सांगितलं जात आहे. मात्र मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. समाजाच्या प्रगतीसाठी जे करता येईल ते मी करतच राहणार असं म्हणत संजय राठोड यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत.
ADVERTISEMENT