सोलापूरचा मुलगा तेलंगणात सापडला, अपहरणाच्या तीन महिन्यानंतर घरी परतला

मुंबई तक

ADVERTISEMENT

solapur kidnapped boy found in telangana
solapur kidnapped boy found in telangana
social share
google news

Solapur boy returns home three months after kidnapped: सोलापूरच्या मोहोळ (Solapur Mohol) तालूक्यातून तीन महिन्यापुर्वी एका 11 वर्षाचा मुलाचं (Boy kidnap) अपहरण झाल्याची घटना घडली होती. या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना (police) हा मुलगा तेलंगणात सापडला आहे. त्यानंतर आता तीन महिन्यानंतर तो घरी परतला आहे. मुलगा घरी परतल्याने कुटूंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपी रंगारेड्डीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.(solapur kidnapped boy found in telangana returns after three months letter home shocking kidnapping story)

मुलाचे घराशेजारून अपहरण

मोहोळ तालुक्यात घराजवळ खेळत असताना 11 वर्षाच्या मुलाला (Boy kidnap) गोड बोलून पळवून नेल्याची घटना घडली होती. जत्रेत नेतो म्हणत आरोपीने त्याचे अपहरण केले होते. या अपहरणानंतर 11 जानेवारी 2023 रोजी चिंचोली काठी औद्योगिक वसाहत येथील प्रकाश कुणचकोर यांनी अकरा वर्षाचा नातू हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मोहोळ पोलिसांनी (police) मुलाचा शोध घेण्यासाठी एका पथकाची स्थापना केली होती. हे पथक मुलाचा शोध घेत होती. पथकाने अथक प्रयत्न करून देखील त्यांना यश आले नव्हते. मुलगा कुठेच सापडत नाही. शेवटी सायबर सेलच्या मदतीने तपास केला असता घटनेचा उलगडा झाला.

हे ही वाचा : इमारतीवरून पडलेली सळई तरूणाच्या शरीराच्या गेली आरपार

हॉटेलमध्ये भंगार गोळा करायचा…

पोलिस पथकाला (police team) अपयश आल्याने या प्रकरणात शेवटी सायबर सेलच्या मदत घेण्यात आली होती. सायबर सेलच्या मदतीने या अपहरणाचा पर्दाफाश झाला. सदरचा मुलगा हा तेलंगाना राज्यातील विकाराबाद जिल्ह्यात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता आरोपी रंगारेड्डी हा एका हॉटेलात काम करत होता तर त्याने मुलाला भंगार गोळा करणाऱ्या दुकानात काम करण्यास ठेवल्याचे आढळले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ज्यावेळेस पोलिस घटनास्थळी पोहचले तेंव्हा पीडित मुलगा हा कचऱ्यातील प्लास्टिक बाटल्या गोळा करत असल्याचे दिसून आले होते. पोलिसांनी पीडित मुलाला आम्ही पोलीस असल्याचे सांगितले तेंव्हा त्याने गहिवरून पोलिसांना मिठी मारली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मुलाची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले.

हे ही वाचा : मच्छर मारणाऱ्या कॉईलने घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव, नेमकं काय घडलं?

या घटनेनंतर मुलाला सोलापूरात आणण्यात आले. तब्बल 3 महिन्यांनी मुलगा घरी परतल्याने आईचे डोळे भरून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिकचा तपास सुरु केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT