“तानाजी सावंत राजकारणातील सूर्याजी पिसाळ, दारु पिऊन…”; युवा सेनेचा नेता आरोग्यमंत्र्यांवर भडकला
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शनिवारी जोरदार टीका केली होती. बापाची विचारधारा सोडून दिली, अशा शब्दात सावंतांनी टीका केली होती. तसंच उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीवर ठणकावून सांगणारा मी पहिला मंत्री आहे, असं देखील तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील मेळाव्यात बोलले होते. यावर आता उद्धव ठाकरे गटाकडून उत्तर आलं आहे. तानाजी सावंत यांना […]
ADVERTISEMENT
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शनिवारी जोरदार टीका केली होती. बापाची विचारधारा सोडून दिली, अशा शब्दात सावंतांनी टीका केली होती. तसंच उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीवर ठणकावून सांगणारा मी पहिला मंत्री आहे, असं देखील तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील मेळाव्यात बोलले होते. यावर आता उद्धव ठाकरे गटाकडून उत्तर आलं आहे. तानाजी सावंत यांना सत्तेची गुर्मी आली आहे.उद्धव ठाकरेंना ठणकावणारा या महाराष्ट्रात अजून पैदा झाला नाही, असे युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी तानाजी सावंतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले शरद कोळी?
कोण तानाजी सावंत? तानाजी सावंतांसारखे 100 जरी आले तरी या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना ठणकवणारा पैदा झालं नाही, अशा शब्दात कोळींनी तानाजी सावंत यांचा समाचार घेतला. दोन दिवस दिल्लीत जाऊन मोदींना जाऊन भेटले असते तर सत्ता मिळाली असती. मात्र उद्धव ठाकरेंच्या डोक्यात वेगळेच वारे सुरु होते, असं तानाजी सावंत म्हणाले होते. यावर बोलताना कोळी म्हणाले, शिवाजी महाराजांना मुघलांनी अनेक आमिषे दिली मात्र महाराज दिल्लीच्या तख्तासमोर झुकले नाही. तीच विचारधारा घेऊन उद्धव ठाकरे काम करत आहेत. भाजपने शंभरवेळा जरी सत्ता दिली तरी उद्धव ठाकरे अशा सत्तेवर लाथ मारतील, असं कोळी म्हणाले.
हे वाचलं का?
तानाजी सावंत दारू पिले होते का? : शरद कोळी
तानाजी सावंत यांनी शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यावरून उद्धव ठाकरेंवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, शरद कोळी यांनी थेट तानाजी सावंत दारू पिऊन बोलत होते का? असा सवाल उपस्थित केला. सध्या तानाजी सावंतने सत्तेची गुर्मी आली आहे. त्यांना जातीय दंगली घडवायचे आहेत, म्हणून असे मुद्दे ते उपस्थित करत आहेत.
ADVERTISEMENT
तानाजी सावंत राजकारणातील सूर्याजी पिसाळ : शरद कोळी
ADVERTISEMENT
पुढे बोलताना शिवसेना राज्य विस्तारक शरद कोळी म्हणाले, तानाजी सावंत यांना उद्धव ठाकरे त्यांच्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे गद्दार सूर्याजी पिसाळ होते, तसे सावंत हे राजकारणातील सूर्याजी पिसाळ असून त्यांची मुंडके छाटल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही, असेही शरद कोळी यांनी सांगितलं आहे.
तानाजी सावंतांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे
पन्नास खोके, गद्दार, मुर्दाबाद, अमुक तमुक आम्हाला म्हणतात. आमचं तर सोडा पण ज्या बापाने जन्म दिला त्या बापाचे विचार तुम्ही सोडून दिले, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, असं सावंत म्हणाले. तुम्ही म्हणता माझ्या बापाचे फोटो लावायचे नाही, मग आमचा शिवबा तुम्हाला चालतो. महात्मा गांधी, बाळासाहेब, आनंद दिघे, शिवाजी महाराज, अंबाबाई यांचे फोटो लावा किंवा लावू नका असं म्हणण्याचं तुम्हाला काय अधिकार, असा प्रश्न त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना विचारला.
पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले, आज कळालं इतकी वर्ष घर प्रपंच सोडून ज्यांच्या मागे होतोत त्यांची बौद्धिक क्षमता काय आहे. त्यांना फक्त लेना बँक माहितीय देना नाही. आणि 50 खोकेचा अर्थ काय हे फक्त मला आणि माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माहितीय. म्हणून सांगतो फक्त आम्हाला बोलू देऊ नका, आमच्या तोंडातून वदवून घेऊ नका, तत्कालीन पक्षप्रमुख म्हणून तुम्हाला विनंती करतो, असा इशाराच तानाजी सावंतांनी उद्धव ठाकरेंना देऊन टाकला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT