Pune : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आईला काठीने मारहाण, लहान भावाच्या छातीत भाला खुपसला
आईला काठीने का मारलं असा जाब विचारणाऱ्या लहान भावाच्या छातीत मोठ्या भावाने भाला खुपसल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात घडली आहे. या घटनेत लहान भाऊ प्रवीण शिंदे हा गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सुनील शिंदेला अटक केली आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आरोपी सुनील शिंदे आपल्या आईकडे […]
ADVERTISEMENT
आईला काठीने का मारलं असा जाब विचारणाऱ्या लहान भावाच्या छातीत मोठ्या भावाने भाला खुपसल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात घडली आहे. या घटनेत लहान भाऊ प्रवीण शिंदे हा गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी सुनील शिंदेला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी आरोपी सुनील शिंदे आपल्या आईकडे दारु पिण्यासाठी पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडून सुनिल शिंदे यांने आईला शिवीगाळ करून हाता पायावर काठीने मारहाण केली. हा प्रकार भाऊ प्रविण शिंदे याला कळताच आरोपी सुनिल यांला तु आईला का मारहाण केली असा जाब विचारला असता राग मनात धरुन सुनिल याने घरात ठेवलेला लोखंडी भाला आणून प्रविण वर प्रहार केला.
यावेळी प्रवीणने भाला धरुन वार चुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी प्रवीणच्या दोन्ही हातांना गंभीर जमखा झाल्या त्यामुळे भाला थेट प्रवीणच्या छातीच्या उजव्या बाजूला खोलवर जाऊन गंभीर जखम झाली आहे. हा प्रकार गावातील इतर व्यक्तींना कळल्यानंतर ते वाद सोडवण्यासाठी घरात आले. हे पाहताच आरोपी मोठा भाऊ सुनील मोटारसायकलवरुन पळून गेला. पोलिसांनी आरोपी सुनिल शिंदे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. जखमी प्रविण यांच्यावर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हे वाचलं का?
Nashik Crime : दारुच्या नशेत असताना अट्टल गुन्हेगाराची हत्या, टोळीयुद्धातून प्रकार घडल्याचा अंदाज
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT