अनिल देशमुखांना मोठा धक्का, विशेष कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) विशेष न्यायालयाने आज (14 मार्च) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने कथित 100 कोटी रुपयांच्या खंडणी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते अद्यापही तुरुंगातच आहेत.

ADVERTISEMENT

100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर आज निर्णय सुनावण्यात आला. यावेळी कोर्टाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन याचिकेवर मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयच्या या निकालानंतर अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाला ईडीने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.

अनिल देशमुख हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्यांना जामीन मंजूर करू नये. असा युक्तिवाद ईडीने कोर्टात केला होता. त्यानंतर कोर्टाने देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. अनिल देशमुख हे सध्या मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहेत.

हे वाचलं का?

देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात शुक्रवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहात येऊन त्यांचा जबाब नोंदवला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

वास्तविक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी मुंबईतील काही निवडक पोलीस अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. तर देशमुख यांनी हे आरोप षडयंत्र असल्याचे म्हटले होते. मनी लाँड्रिंगच्या आणखी एका प्रकरणात देशमुख यांना ईडीने अटक केली होती.

ADVERTISEMENT

परमबीर सिंगच अँटेलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड-अनिल देशमुख

ADVERTISEMENT

मनी लाँडरिंगचं नेमकं प्रकरण काय?

कोरोना काळामध्ये लॉकडाउनदरम्यान जेव्हा सरकारने सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट-बारवर निर्बंध लावले होते, त्यावेळी सचिन वाझे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन बार मालकांकडून 3 लाख रुपये वसूल करायचा. मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमधून सचिन वाझेने डिसेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत 4 कोटी 70 लाख रुपये वसूल केल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं होतं.

अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन आपण ही रक्कम त्यांचे सेक्रेटरी कुंदन शिंदे यांच्याकडे दिल्याचं सचिन वाझेने ईडीच्या चौकशीत सांगितलं आहे. कुंदन शिंदे हा अनिल देशमुखांच्या श्री. साई शिक्षण संस्थेचा सदस्य आहे. या शिक्षण संस्थेत अनिल देशमुखांनी वसूल केलेला पैसा गुंतवण्यात आला होता. ज्यानंतर ईडीने नागपूरमधील या संस्थेच्या कार्यालयावर छापेमारी केली होती.

अनिल देशमुखांचा आणखी एक सहकारी सुर्यकांत पालांडे हा अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बारमधून मिळणाऱ्या पैशांची व्यवस्था पहायचा. मुंबईतील बार मालकांकडून गोळा करण्यात आलेला पैसा अनिल देशमुखांनी आपला मुलगा सलिल आणि हृषिकेशच्या माध्यमातून बोगस कंपन्यांच्या द्वारे आपल्या शैक्षणिक संस्थेत वळवल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. ज्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT