पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, नैराशामुळे उचलले टोकाचे पाऊल

मुंबई तक

पुण्यात MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या सदाशिव पेठ भागात ही घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या वसतिगृहात या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नवी पेठेतील […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पुण्यात MPSC च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या सदाशिव पेठ भागात ही घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या वसतिगृहात या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अमर मोहिते असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस या ठिकाणी आले आणि त्यांनी मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,नवी पेठेतील विठ्ठल मंदिरा मागे असलेल्या सोसायटीत अमर रामचंद्र मोहिते हा तरुण राहत होता.तो मूळचा तासगाव येथील असून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी काही वर्षापासून करीत होता. मराठा आरक्षण रद्द झाल्याने Psi च्या फिजिकल स्पर्धेतून तो बाहेर पडला होता आणि स्पर्धा परीक्षा देखील कोरोनामुळे रद्द झाल्याने अमर कायम नैराश्यात होता.यातूनच अमर मोहिते या तरुणाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी सांगितले.

एमपीएससीची परीक्षा पास होऊन दीड वर्ष उलटूनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात सहा महिन्यांपूर्वी स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेत जीवन संपवले होते. स्वप्निल एमपीएससीची पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला होता. मात्र त्यानंतरही दोन वर्ष मुलाखतीला कॉल आला नाही. स्वप्निलच्या घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यात शिक्षणासाठी घेतलेले कर्ज यामुळे मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केली होती.

इंदापूर: टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

हे वाचलं का?

    follow whatsapp