मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, रूग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना लीलावती रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टेनिस खेळण्याची सवय आहे. ते आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून टेनिस खेळतात. काही दिवसांपूर्वी ते टेनिस खेळता खेळता पडले आणि त्यांच्या पाठीला मार लागला होता. जिथे मार लागला त्या ठिकाणी रक्तही साकाळलं होतं. त्यावरच शस्त्रक्रिया करण्यात आली. राज ठाकरेंना शनिवारी अॅडमिट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. राज ठाकरेंना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, केली महत्त्वाची मागणी

राज ठाकरेंना आराम करण्याची सूचना

हे वाचलं का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठीवर शनिवारी संध्याकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विनोद अगरवाल, राज ठाकरेंचे मित्र आनंद उत्तुरे आणि मी आम्ही तिघेही यावेळी उपस्थित होतो. आज सकाळी राज ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना काही वेदनाशमक गोळ्या घ्याव्या लागणार आहेत तसंच काही दिवस आरामही करावा लागणार आहे असंही डॉ. पारकर यांनी सांगितलं.

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास केंद्राने केल्यास ‘फटाक्याची माळ’ लागेल: राज ठाकरे

ADVERTISEMENT

सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित नव्हते राज ठाकरे

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. लीलावती रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळेच ते शनिवारी संध्याकाळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजर राहू शकले नाहीत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही दिवसांपूर्वी संवाद साधला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दलची माहितीही दिली होती.

उद्धव ठाकरेंच्या हातात राज्य आलं आहे की त्यांच्यावर राज्य आलं आहे? राज ठाकरेंचा मिश्कील प्रश्न

राज ठाकरे यांची प्रकृती आता पूर्णपणे स्थिर आहे. दीड महिन्यापूर्वी ते टेनिस खेळताना पडले होते त्यामुळे त्यांच्या हाताला आणि कंबरेला मुका मार लागला होता. कंबरेला जिथे मुका मार लागला तिथे रक्तही साकाळले होते. त्यामुळे राज ठाकरेंवर शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या या शस्त्रक्रियेची माहिती जेव्हा उद्धव ठाकरेंना मिळाली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फोन करून त्यांची विचारपूस केली असंही जलील पारकर यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT