Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

election commision releases final voter turnout data first phase second phase voting percentage
दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाले आहे.
social share
google news

Lok Sabha Election Voting Percentage First and Second Phase : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. हा दुसरा टप्पा पार पडल्याच्या काही दिवसांनी निवडणूक आयोगाने (ECI) मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाले आहे. यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगाने नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे आयोगाने दिलेल्या माहितीत 5.75 टक्के फरक होता. त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली? आणि आकडेवारी जाहीर करण्यात इतका विलंब का होतोय? असा सवाल उपस्थित होत आहे. (election commision releases final voter turnout data first phase second phase voting percentage) 

लोकसभेच्या 102 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. यानंतर 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान झाले होते. यानंतर निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 66.14 टक्के मतदान झाले आणि दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले आहे. 

निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 60.96 टक्के मतदान झाले. यानंतर, 30 एप्रिल रोजी संध्याकाळी, आयोगाने माहिती दिली की दुसऱ्या टप्प्यात 66.71 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या चौथ्या दिवशी आयोगाने दिलेल्या माहितीत 5.75 टक्के फरक आढळला होता. इतक्या दिवसांनी मतदानाची टक्केवारी कशी वाढली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

नेत्यांनी घेतला आक्षेप

मतदानाच्या टक्केवारीत दिसत असलेल्या या फरकानंतर अनेक नेत्यांनी यावर निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांनी एक्सवर लिहिले की, “दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या 4 दिवसांनंतर जाहीर झालेला आयोगाचा अंतिम डेटा 5.57% ची वाढ दर्शवितो. हे सामान्य आहे का? मला काही समजत नाही का?असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

आम आदमी पार्टीचे नेते योगेंद्र यादव यांनी या नव्या आकडेवारीवरून निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. “मी 35 वर्षे भारतीय निवडणुका पाहिल्या आणि त्यांचा अभ्यास केला. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी जाहीर होणारी आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात 3 ते 5 टक्के फरक असणे ही नवीन गोष्ट नाही. पण यावेळी काही गोष्टी असामान्य आणि चिंताजनक वाटतायत,असे योगेंद्र यादव यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

निवडणूक आयोग काय म्हणाले? 

निवडणूक आयोगात उच्च पदावर असलेल्या सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलच्या संध्याकाळी ही आकडेवारी आली तेव्हाही शेकडो मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतदानाची मुदत संपताच मतदान केंद्रांचे दरवाजे बंद करण्यात आले. कायद्यानुसार तोपर्यंत मतदान केंद्रात दाखल झालेल्या मतदारांना मतदानाची संधी मिळते. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Covid लसीच्या सर्टिफिकेटवरून PM मोदींचा फोटो गायब

तसेच दुर्गम किंवा दुर्गम डोंगराळ भागात किंवा घनदाट जंगलात असलेल्या गावांच्या बूथवरून मतदान करणाऱ्या टीमला ईव्हीएम सेटसह मुख्यालयात पोहोचण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ परत यायलाही लागतो. काही ठिकाणी मतदान पथक एक ते दोन दिवसांनी तर काही भागात अडीच ते तीन दिवसांनीही स्ट्राँग रूममध्ये पोहोचते. त्यानंतर त्यांची आकडेवारी अद्ययावत केली जाते.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार वेबसाइटवरील शेवटची आकडेवारी 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होती. हा अंतिम आकडा नव्हता. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानाची वेळ वाढवण्यात आली. फाइलिंगचे आकडे मोजले जातात तेव्हा अंतिम डेटामधील संख्या वाढणे सामान्य आहे,असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT