नंदूरबार: अशी असावी IAS अधिकारी, आपल्या दोन्ही मुलांना टाकलं ZP शाळेत!

मुंबई तक

Viral News: नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेत घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

ADVERTISEMENT

viral news nandurbar district collector mittali sethi admitted both her children to zilla parishad school her decision currently being praised everywhere
नंदूरबारच्या जिल्हाधिकारी मॅडमची तुफान चर्चा
social share
google news

नंदूरबार: नंदूरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आपल्या जुळ्या मुलांचा प्रवेश नंदूरबार शहरातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, टोकरतलाव येथील अंगणवाडीत करून एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. शासकीय शाळांबाबत समाजात विश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडावा, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक होत असून, हा निर्णय इतरांसाठी अनुकरणीय ठरला आहे.

शासकीय शाळांबाबत सकारात्मक संदेश

डॉ. सेठी यांनी आपल्या मुलांना खासगी शाळांऐवजी शासकीय शाळेत प्रवेश देऊन शासकीय शिक्षण व्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे शासकीय शाळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले आहे. "जिल्हाधिकारी यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याने असा निर्णय घेतल्याने सामान्य पालकांनाही शासकीय शाळांबाबत विश्वास वाटेल. यामुळे समाजात समानतेचा संदेशही पोहोचेल," असे स्थानिक शिक्षक आणि पालकांनी सांगितले.

शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी पाऊल

जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या या निर्णयामुळे नंदूरबार जिल्ह्यातील पालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी एक आदर्श निर्माण झाला आहे. शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन अनेकदा केले जाते, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन असे पाऊल उचलणे दुर्मिळ आहे. या निर्णयामुळे शासकीय शाळांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.

हे ही वाचा>> रिक्षा चालकाची मुलगी ते महाराष्ट्राची पहिली मुस्लिम महिला IAS,अदिबा अहमदची मार्कलिस्ट पाहिली का?

जिल्हा परिषद शाळेची वैशिष्ट्ये

टोकरतलाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही नंदूरबार शहरातील एक महत्त्वाची शाळा आहे. या शाळेत अंगणवाडीपासून प्राथमिक शिक्षणापर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. डॉ. सेठी यांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश देऊन स्थानिक शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp