Narayan Rane :  "शरद पवार अस्वस्थ झाले असते, तर ८४ वर्ष जगले नसते", राणेंचं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

नारायण राणे यांची शरद पवार यांच्यावर टीका.
नारायण राणे आणि शरद पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नारायण राणे यांची शरद पवारांवर टीका

point

शरद पवारांनी मोदींवर केली होती टीका

point

प्रचारात 'भटकती आत्मा'वरून टोलेबाजी

Narayan Rane on Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 'भटकती आत्मा'वरून महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. मोदींना उत्तर देताना पवारांनी सांगितले की, हो, मी शेतकरी आणि कामगारांसाठी अस्वस्थ आहे. आता पवारांच्या याच विधानावर बोट ठेवत नारायण राणे यांनी एक मोठं विधान केलं आहे. (Narayan Rane big statement about sharad pawar. he said that if Sharad Pawar had felt uneasy, he would not have lived for 84 years.) 

ADVERTISEMENT

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या नारायण राणे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. प्रचार सभामधून ते पवारांना उलट प्रश्नही विचारताना दिसत आहेत. नारायण राणे पवारांबद्दल काय बोलले, ते वाचा...

नारायण राणे भाषणात नेमकं काय म्हणाले? वाचा जसंच्या तसं

"एक वाक्य बोलले. 'इस महाराष्ट्र में अस्वस्थ नेताजन है, खाली भटक रहा है उनका आत्मा', हे मोदीजींचं वाक्य; काही जणांना लागलं. मोदीजींनी तर नाव घेतलं नाही. एक व्यक्ती असे म्हणाले की, 'महागाईसाठी लोक त्रस्त आहे. महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी अस्वस्थ आहे. पवार साहेब कधीपासून हो?"

हे वाचलं का?

हेही वाचा >> निकालाआधीच काँग्रेसने गमावल्या दोन जागा, महाराष्ट्रात थोडक्यात वाचली!

"वय वर्ष ८४... ८५  डिसेबर १२ ला लागेल. कशामुळे अस्वस्थ? एवढी जनतेची आस्था प्रेम आहे.शेतकरी आणि जनता. किती वर्षे सत्तेवर होतात. केंद्रात मंत्री १२ वर्षे. मोदींनी सांगितलं भारत महासत्ता बनवेन. देशाला तिसऱ्या क्रमांकावर आणेन. मोदी कर्तबगारी सिद्ध करताहेत. अमेरिका, इटली, इस्रायल अशा भल्याभल्या देशाच्या अध्यक्षांनी मोदींचं कौतुक केलं. प्रशासन हाताळण्याची त्यांची क्षमता. कर्तृत्वान पुरुष म्हणून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा."

हेही वाचा >> "शिंदेंनी सांगावं की, मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होते?"

"हे (शरद पवार) एवढे जुने जाणते. आमची अपेक्षा होती हो. पवारसाहेब, चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. आपल्याला साधुसंतांनी सांगितलं आहे. पण, नाही. नाही म्हणायचं. ना घरच्यांना म्हणायचं, ना बाहेरच्यांना म्हणायचं."

ADVERTISEMENT

सिंधुदुर्गमधील भाषणात नारायण राणे काय म्हणालेय़?

"शरद पवार अस्वस्थ झाले असते एखाद्या विषयासाठी, ८४ वर्ष नाही जगले असते. माणसाला हवामानामुळे अस्वस्थ झाला काय, ५०-५५ वर्षात अटॅक येतो. माणसं जातात. ८४ वर्षात जग इकडच्या तिकडं होवो... वादळ, पूर येवो, काय नाही. शरद पवारांना काही होत नाही. बिनधास्त असतात. मोदी साहेबांना उकसवतात. तुमचं सरकार गेल्याशिवाय माझी अस्वस्थता जात नाही. आमचं सरकार जाणार नाही. चारशे खासदार येऊन आमचं मेजॉरिटी सरकार येणार, मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार", असं राणे म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT