सुप्रिया सुळेंची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा, पाहा राजधानी दिल्लीत नेमकं काय सुरुयं!
नवी दिल्ली: महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. यामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ सुरु आहे. या सगळ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (24 मार्च) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चा केली आहे. दरम्यान, ही चर्चा प्रत्यक्ष भेटून झाली की फोनवरुन याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र चर्चा झाल्याचं ट्विट स्वत: सुप्रिया सुळे […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. यामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ सुरु आहे. या सगळ्यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (24 मार्च) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चा केली आहे. दरम्यान, ही चर्चा प्रत्यक्ष भेटून झाली की फोनवरुन याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र चर्चा झाल्याचं ट्विट स्वत: सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, यावेळी नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, अचानक या चर्चेमागचं कारण काय? याविषयी राजकीय वर्तुळात बरेच अंदाज व्यक्त केले जात आहेत.
पाहा सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय ट्विट केलंए?
हे वाचलं का?
‘खूप खूप धन्यवाद… मा. सोनिया गांधीजी तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी. तुमच्याशी संवाद साधण्यात नेहमीच आनंद होतो.’
Thank you so much Hon. Mrs. Sonia Gandhi Ji for your valuable guidance. It’s always such pleasure interacting with you.
— Supriya Sule (@supriya_sule) March 25, 2021
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील खासदारांसह काही महत्त्वाच्या नेत्यांसाठी दिल्लीतील आपल्या निवसास्थानी खास डिनर आयोजित केलं होतं. ज्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती. पण सुप्रिया सुळे या कार्यक्रमातून शरद पवारांच्या आधी बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे त्या तिथून थेट सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी बाहेर पडल्या असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ADVERTISEMENT
Mohan Delkar Case : सुप्रिया सुळेंनी ओम बिर्लांकडे केली ही मागणी
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात सध्या ज्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत आणि जे राजकारण सुरु आहे त्याविषयी देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी काँग्रेस हायकमांडशी केलेली ही चर्चा फारच महत्त्वाची समजली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी देखील महाराष्ट्रातील राजकारणावर आधीच माहिती घेतली असल्याचं समजतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काय घडतंय याकडे सध्या राजधानी दिल्लीचं देखील लक्ष आहे.
सुप्रिया सुळेंनी सांगितलं शरद पवारांच्या पावसातल्या सभेचं गुपित
काँग्रेस अध्यक्षा राष्ट्रवादीवर होत्या नाराज?
दरम्यान, असं असलं तरीही सुप्रिया सुळे यांची सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली असली तरीही राजकीय वर्तुळात असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना यूपीए अध्यक्ष बनवलं जावं असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. खरं तर काँग्रेसला ही गोष्ट पचनी पडणं अवघडच आहे पण अद्याप तरी काँग्रेस नेत्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण यामुळे काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे याबाबत देखील कालच्या चर्चेत सोनिया गांधीशी बोलणं झालं असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
शरद पवारांचे भाजपविरुद्ध लढण्यासाठी तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न
दुसरीकडे भाजपविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तिसरी आघाडी बनविण्याच्या तयारीत असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशावेळी काँग्रेसची नेमकी भूमिका काय असेल याचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसला विचार करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT