भीषण अपघातात सुशांत सिंग राजपूतच्या 5 नातेवाईकांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bihar Road Accident: बिहारमधील लखीसराय (Lakhisarai Accident) येथे झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण एका अंत्यसंस्काराहून सुमो कारने जमुईला परतत होते. त्यावळी त्यांची कार ट्रकला धडकली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले 5 जण हे दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे (Sushant Singh Rajput) नातेवाईक होते.

ADVERTISEMENT

लखीसराय जिल्ह्यातील सिकंदरा-शेखपुरा NH-333 वर पिपरा गावाजवळ मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. ट्रकच्या भीषण धडकेत सुमोमधील एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जमुई येथील सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंत्यसंस्कार करून परतत होते सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक अन् काळाने घातली झडप

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, सुमोमध्ये बसलेले सर्व 10 लोक हे अंत्यसंस्कार आटोपून पाटणाहून जमुईला परतत होते, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सिकंदरा-शेखपुरा महामार्गावर सुमो आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित चार जण गंभीर जखमी झाले. ट्रकवर रिकामे एलपीजी सिलिंडर भरलेले होते.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, जमुई जिल्ह्यातील खैरा पोलीस स्टेशन हद्दीतील सगदहा भंडारा गावातील लालजीत सिंह यांची पत्नी गीता देवी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिल्यानंतर ड्रायव्हरसह एकाच कुटुंबातील 10 जण हे सुमो कारने आपल्या गावी परतत होते. पण वाटेत एक भीषण अपघात झाला, ज्यात गीता देवी यांचे पती लालजीत सिंह, मोठा मुलगा अमित शेखर उर्फ ​​नेमानी सिंह, लहान मुलगा रामचंद्र सिंह, मुलगी बेवी देवी, भाची अनिता देवी आणि चालक प्रीतम कुमार यांचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Sushant Singh च्या मृत्यूचं गूढ कायम, चाहत्यांकडून अभिनेत्याला आदरांजली

मृत लालजीत हा सुशांत राजपूतच्या नातेवाईक

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 6 जणांपैकी लालजीत सिंग हा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा मेहुणा होता. सुशांत सिंग राजपूतचा मेहुणा हरियाणातील पोलीस खात्यात उच्च पदावर कार्यरत असून त्याचे नाव ओमप्रकाश सिंग आहे. ओमप्रकाश सिंह यांची बहीण गीता देवी यांच्या अंत्यसंस्कारानंतर सर्वजण पटनाहून जमुई येथील त्यांच्या घरी येत होते. दरम्यान, या अपघातानंतर त्यांच्या कुटुंबावर आणि गावातही शोककळा पसरली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT