Sheetal Mhatre: व्हायरल व्हिडीओवरून सुषमा अंधारेंनी शीतल म्हात्रेंनाच सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sheetal Mhatre News: शिवसेनेने काढलेल्या आशीर्वाद यात्रेतील शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असून, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. अप्रत्यक्षपणे शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटालाच यासाठी जबाबदार धरलं असून, आता या प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांनी म्हात्रेंनाच सुनावलं आहे. (sushma Andhare Reaction On Sheetal Mhatre prakash surve Viral video)

ADVERTISEMENT

झालं असं की शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेने मुंबईत आशीर्वाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जात आहे. अशाच एका यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये आमदार प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे दिसत आहे. या व्हिडीओवरून म्हात्रेंनी ठाकरे गटावर टीका केलीये.

sheetal Mhatre : व्हिडीओ व्हायरल, मध्यरात्री रंगलं नाट्य; शीतल म्हात्रे संतापल्या

हे वाचलं का?

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ : सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “माफ करा, मी अशा कुठल्याही व्यक्तींवर ज्यांची भाषाच इतकी अर्वाच्च आणि गलिच्छ असते. अशा लोकांवर बोलून मी माझी लेव्हल अजिबात खाली घसरवू इच्छित नाही. मला त्याच्यावर काहीच बोलायचं नाही.

सूरज चव्हाण यांनी शीतल म्हात्रेंना सांगितला जुना किस्सा; म्हणाले, ‘पेराल तेच उगवेल’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी या प्रकरणावर बोलताना म्हटलं आहे की, “खरंतर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचं समर्थन आम्ही करत नाही. परंतु शीतल म्हात्रेंनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यांनी जे पेरलं आहे, तेच आज उगवलं आहे. कारण काही महिन्यांपूर्वी याच शीतल म्हात्रेंनी स्वतःच्या सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर सुप्रिया सुळे बसलेल्या एक फोटो व्हायरल केला होता. आणि आज त्यांना दुःख होतंय. एक लक्षात ठेवलं पाहिजे की, जे पेरलं तेच उगवतं”, असं सूरज चव्हाण या प्रकरणावर म्हणाले.

ADVERTISEMENT

Sheetal Mhatre and MLA Prakash Surve viral video case: दोन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून त्यांना अटकही होऊ शकते अशी माहिती सुत्रांनी दिली. हा व्हिडीओ कुणी बनवला आणि कुणी कुणी व्हायरल केला, याचा तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT