उद्धव ठाकरेंची नक्कल करत राज यांनी केली टीका, सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘निव्वळ सुपारीबाज…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली आणि सत्ता आणि पैशासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याचा आरोप केला. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाची प्रतिक्रिया आलीये. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना उत्तर देताना सुपारीबाज आंदोलनं बंद करण्याचा सल्ला दिलाय.

ADVERTISEMENT

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “राजभाऊंचा तो स्वभाव नाही, असं ते ज्यावेळी म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. शब्द सत्यात उतरले पाहिजे. ईडीच्या नोटिशीनंतर राजभाऊंचा ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद व्हिडीओ’ का झाला, यावर त्यांनी बोलणं अपेक्षित होतं.”

एकनाथ शिंदेंनी कांडी फिरवली या राज यांच्या विधानावर सुषमा अंधारे म्हणाल्या, “एकनाथ शिंदेंनी जादूची कांडी फिरवली आणि त्यानंतर काय झालं, यावर बोलण्यापेक्षा राज साहेब मराठीचा मुद्दा घेऊन मी महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहत आहे. काय निर्माण करणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजाचा अवमान करणाऱ्या राज्यपालांबद्दल आपण काहीच बोलू इच्छित नाही. त्यांनी पायउतार होण्यासंदर्भात आपण ठामपणे विधान करू शकत नाही.”

हे वाचलं का?

“मनसे अध्यक्ष म्हणजे ‘ओके’ साबण”, राज ठाकरेंना काँग्रेसनं डिवचलं, व्हिडीओच लावला

तुम्ही फक्त कुटुंबातच जोर दाखवता, सुषमा अंधारे राज ठाकरेंना काय म्हणाल्या?

“देवेंद्रजींनी मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना, उनसे झाली उमेदवार नसलेल्या शब्दात अवहेलना केली. तुम्ही त्यांना ठामपणे उत्तरं देऊ शकत नाहीत. तुम्ही जोर दाखवता तो कुटुंबातच. तुम्ही फक्त भावकीत भांडण करायची शिरशिरी दाखवता”, असा टोला त्यांनी लगावला.

ADVERTISEMENT

“तुम्ही आजही कुटुंब म्हणून एकत्र थांबून शत्रुला मुहतोड जबाब दिला पाहिजे, पण तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही ना राज्यपालांना बोलू शकता, ना तुम्ही देवेंद्रजींना प्रश्न विचारू शकता. यातच कळत की पैसे कुणी घेतले किंवा ईडीच्या नोटिशीची भीती कुणाला वाटलीये. आम्हाला भीती वाटली असती, तर आम्ही बिळात बसलो असतो. आम्ही ठामपणे लढतोय. आम्ही बाहेर आहोत आणि लढतोय”, असं उत्तर सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिलं.

ADVERTISEMENT

राज्यपाल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे ते शिंदे गट : राज यांनी घेतला ‘ठाकरे’ शैलीत समाचार

‘पक्षाच्या भवितव्यासाठी काम करा’, भोंगे उतरवण्याच्या मुद्द्यावरून सुनावलं

“शिळ्या कढीला ऊत आणणं म्हणजे काय, हे त्यांच्याकडून शिकायला हवं. भोंगे उतरवायचे की नाही उतरवायचे यावर त्यांनी बोलत राहावं. पण प्रश्न हा आहे की, भोगें उतरवल्यानं महाराष्ट्राचं कोणतं नवनिर्माण होणार आहे? भोंगे उतरल्याने महाराष्ट्रातून गेलेले प्रोजेक्ट परत येणार आहे का? जे लाखो लोक बेरोजगार झाले त्यांना रोजगार देणार आहात का? अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? या प्रश्नांची उत्तर होकारार्थी असेल, तर आम्हीही भोंगे उतरवायला तुमच्यासोबत राहू. पण नकारार्थी असतील, तर राजकारणासाठी राजकारण का करता? तुम्ही कधीतरी पक्षाच्या भवितव्यासाठी काम करा. निव्वळ सुपारीबाज आंदोलनं करणं बंद केलं पाहिजे”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT