तरला दलाल यांच्या भूमिकेत झळकणार हुमा कुरेशी, सिनेमाचं खास पोस्टर व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुप्रसिद्ध शेफ आणि खाद्यपदार्थ विषयक लेखन करणाऱ्या लेखिका तरला दलाल यांच्या बायोपिकमध्ये हुमा कुरेशी झळकणार आहे. या सिनेमाचं नाव तरला असं असणार आहे. रॉनी स्क्रूवाला, अश्विनी अय्यर-तिवारी आणि नितेश तिवारी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचं पोस्टर समोर आल्यानंतर ते सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

ADVERTISEMENT

हे पोस्टर समोर आल्यानंतर हुमा कुरेशी ट्विटरवर ट्रेंड होऊ लागली. पियुष गुप्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. गौतम वेद आणि पियुष गुप्ता यांनी हा सिनेमा लिहिला आहे.

हे वाचलं का?

तरला या बायोपिकद्वारे लेखक पियुष गुप्ता दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. नितेश तिवारी आणि पियुष गुप्ता हे दीर्घकाळ एकमेकांचे सहकारी होते. त्यांनी दंगल आणि छिछोरे या दोन सिनेमांमध्ये सोबत काम केलं आहे. द तरला दलाल शो आणि कुक इट अप विथ तरला दलाल या लोकप्रिय टीव्ही शोजमधून तरला दलाल या घराघरांमध्ये पोहचल्या आहेत. भोजन साहित्य, वैविध्य पूर्ण पदार्थ, पाककला या सगळ्याशी संबंधित १०० हून अधिक पुस्तकं तरला दलाल यांनी लिहीली आहेत. तरला दलाल यांना २००७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

२०१३ मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. शेफ तरला दलाल या द तरला दलाल कशा झाल्या? या सगळ्याचा प्रवास या सिनेमात साकारण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हुमा कुरेशी म्हणाली की मला ही भूमिका करताना खूपच आनंद होतो आहे. तरला दलाल यांच्यामुळे मला माझ्या लहानपणीच्या आठवणी येतात. माझ्या आईकडे पाककलेसंबंधी जे पुस्तक होतं ते तरला दलाल यांचं होतं. मला शाळेत आई डबा द्यायची तेव्हा त्यात दिलेले पदार्थ बनवत असे.

हुमा पुढे म्हणाली की मला हे पण आठवतंय की मी माझ्या आईला तरला दलाल यांनी सांगितल्याप्रमाणे घरी मँगो आईस्क्रीम तयार करायला मदत केली होती. आता मी तरला दलाल यांची भूमिका साकारते आहे या निमित्ताने माझ्या गोड आठवणी जाग्या झाल्या आहेत. रॉनी, अश्विनी आणि नितेश या तिघांचीही मी आभारी आहे कारण त्यांनी मला ही भूमिका करण्याची संधी दिली. माझ्यावर तो विश्वास दाखवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT