मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ, इंधन दरवाढीमुळे निर्णय
मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सी यांच्या बेस फेअरमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे. ऑटो रिक्षाचे कमीत कमी भाडे १८ रूपयांवरून २१ रूपयांवर गेले आहे. तर टॅक्सीचे कमीत कमी भाडे २२ वरून २५ रुपयांवर गेले आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील पाच वर्षांमध्ये भाडेवाढ […]
ADVERTISEMENT
मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये रिक्षा आणि टॅक्सी यांच्या बेस फेअरमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे. ऑटो रिक्षाचे कमीत कमी भाडे १८ रूपयांवरून २१ रूपयांवर गेले आहे. तर टॅक्सीचे कमीत कमी भाडे २२ वरून २५ रुपयांवर गेले आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅस यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील पाच वर्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आली नव्हती. तसंच आता इंधनाचे दरही वाढले आहेत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. १ मार्चपासून ही दरवाढ लागू होणार आहे असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची घोषणा केली आहे. मागील सहा वर्षांपासून आम्ही कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. आता ही भाडेवाढ रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना देणं आवश्यक होतं. त्यामुळे ही दरवाढ केली आहे असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर वाढले आहेत त्याच पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे हे प्रत्येकी ३ रुपयांनी वाढले आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये ठाकरे सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. वाढलेल्या भाड्याप्रमाणेर रिक्षाचे भाडं १८ वरून २१ रुपयांवर तर टॅक्सीचं भाडं २२ वरून २५ रूपयांवर गेलं आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. पेट्रोल काही ठिकाणी शंभरी पर्यंत पोहचलं आहे. या सगळ्या परिस्थितीत रिक्षा आणि टॅक्सी संघटना या भाडेवाढीची मागणी करत होत्या. तसंच त्यासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत होत्या. भाडेवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांना दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT