रत्नागिरीतल्या समुद्रात नौका बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवस संपर्क नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

ADVERTISEMENT

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील घटना पुढे आली आहे. मासेमारीसाठी गेलेली नविद-2 ही नौका आणि त्यावरील तांडेलसह सहा खलाशी बेपत्ता झाले आहेत. गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात, तशी तक्रार दाखल केली आहे. स्थानिक मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली असून, कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी,कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खाजगी बोटी यांच्याकडून युद्धपातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ हाती घेण्यात आले आहे.           

हे वाचलं का?

जयगड येथील नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. ‘नविद-2’ असे तिचे नाव असून 26 ऑक्टोबरला ही नौका मासेमारीसाठी जयगडहुन निघाली. बहुदा दोन ते तीन दिवसांमध्ये मासेमारी करून नौका परत येते. परंतु यावेळी ती परत आलीच नाही किंवा तांडेल, अन्य खालाशांचा संपर्कच झाला नाही. नासीर संसारे यांनी संपर्क करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. तसेच सोशल मीडियावर त्याची माहिती आणि फोटो देखील व्हायरल केले. मात्र अजून काही संपर्क झालेला नाही. या बोटीवर तांडेल दगडु ,गोविंद , दत्ता, अमोल, सूर्या, अनिल यांची पूर्ण नावे मिळालेली नाही. सर्व राहणारे साखरी आगर येथील आहेत. ते अजून परत आलेले नाहीत. तरी सदर बोटी बद्दल किंवा व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नौका बेपत्ता झाल्याने जयगड आणि साखरीआगर परिसरातील वातावरण अतिशय गंभीर आहे. बेपत्तां लोकांचा शोध घेण्यासाठी काही स्थानिक मच्छीमार देखील बाहेर पडले आहेत. आजचा पाचवा दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कोणालाही कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्याने चिंता वाढली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT