नाशकातील सुफी धर्मगुरुचा ड्रायव्हरनेच केला खात्मा; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नाशिक: येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात झालेल्या अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूच्या हत्येबाबत नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अफगाणी नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून त्यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून चिस्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, या हत्येबाबत इतरही काही कारणं आहे का? याबाबत पोलीस तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक या फरार संशयितांचा शोध घेत आहेत.

नाशिकमध्ये मुस्लीम धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या, Youtubeवरती 2 लाख फॉलोअर्स

हे वाचलं का?

सुफी हे निर्वासित असल्याने त्यांना येथे संपत्ती घेता येत नव्हती, बँक अकाउंट ही नव्हते, त्यामुळे त्यांनी जवळच्या व्यक्तींच्या नावावर अकाउंट उघडले होते, तसेच SUV 500 ही गाडी ही दुसऱ्याच्या नावाने घेतली होती, त्यांचा उत्पन्न सोर्स हा युट्युब चॅनेल आणि लोकांनी दिलेली देणगी हेच होते, पोलीस आता सर्व चौकशी करत आहेत.

चिस्ती गेल्या 4 वर्षांपासून निर्वासित म्हणून भारतात राहत होते, दिल्ली नंतर कर्नाटक आणि गेल्या दीड वर्षांपासून ते नाशिकच्या वावी गावाजवळ रहात होते. मैनुद्दीन चिस्ती यांचे वंशज म्हणून ते मुस्लिम समाजात लोकप्रिय होते, लोक त्यांचा सन्मान ही करत, ते खरच वंशज होते का याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

ADVERTISEMENT

काल संध्याकाळी येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा धर्मगुरू मूळचा अफगाणिस्तान येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असे या अफगाणी सुफी धर्मगुरूचे नाव असून, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT