भारतातला मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण उपचारांमुळे झाला पूर्ण बरा, अंगावर डागही नाहीत
मंकीपॉक्स रोगाबाबत भारतासाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. देशात सर्वात पहिला मंकीपॉक्स संक्रमित आढळलेला रुग्ण मंकीपॉक्स मुक्त झाला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 72 तासात त्याची दोनदा तपासणी करण्यात आली. दोन्ही तपासणीचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. हा देशातील पहिला मन्कीपॉक्स संक्रमित रुग्ण होता. त्याच्यावर केरळ येथे उपचार सुरु होते. […]
ADVERTISEMENT

मंकीपॉक्स रोगाबाबत भारतासाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. देशात सर्वात पहिला मंकीपॉक्स संक्रमित आढळलेला रुग्ण मंकीपॉक्स मुक्त झाला आहे. केरळच्या आरोग्यमंत्री विना जॉर्ज यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. 72 तासात त्याची दोनदा तपासणी करण्यात आली. दोन्ही तपासणीचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत. हा देशातील पहिला मन्कीपॉक्स संक्रमित रुग्ण होता. त्याच्यावर केरळ येथे उपचार सुरु होते. सध्या तो मानसिक आणि शारीरिकरीत्या स्वस्थ असून त्याच्या त्वचेवर आलेले डाग देखील नाहीशे झाले आहेत. त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
केरळ राज्यातील कोल्लम येथील या 34 वर्षीय तरुणाला 14 जुलै रोजी मंकीपॉक्सची लागण झाली होती. विदेशवारी करून आल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. 16 दिवसांच्या उपचारानंतर तो अगदी ठणठणीत बरा झाला आहे. मंकीपॉक्स रोगाबाबत जगभरात दहशत आहे. केरळात पहिला रुग्ण सापडल्यानंतर भारतात देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं मंकीपॉक्सवर योग्य उपचार काय, यावर संशोधन सुरु असताना या रुग्णावर उपचार करावा लागणार होता. अशात योग्य उपचार करून या रुग्णाने मन्कीपॉक्सवर मात केली आहे. मंकीपॉक्समुळे मृत्यूचे प्रमाण हे 11 टक्के असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र, या रोगामुळे अंगावर येणारे फोडं हे शरीराला कुरूप बनवू शकतात. त्यामुळे या रोगाबाबत अनेकांच्या मनात दहशतीचे वातावरण आहे. मात्र, अशात भारतासाठी सकारात्मक बातमी समोर आली आहे.
मंकीपॉक्स हा रोग म्हणजे जागतिक पातळीवरची आरोग्य आणीबाणी असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जेव्हा एखाद्या रोगाच्या जगात केसेस वाढतात तेव्हा अशा प्रकारची घोषणा WHO कडून होते. सध्या 75 देशात मंकीपॉक्सच्या 16000 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत असं WHO च्या महासंचालकांनी सांगितलं. या रोगामुळे आतापर्यंत पाच मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.