रावसाहेब दानवे यांच्या नातवावर 10 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्यांकडून नाशकात तक्रार दाखल
Raosaheb Danve : भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्या विरोधात तब्बल दहा कोटींची फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे नातू शिवम पाटील यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रावसाहेब दानवेंच्या नातवावर दहा कोटींची फसवणुकीचा आरोप
नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raosaheb Danve : भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्या विरोधात तब्बल दहा कोटींची फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे नातू शिवम पाटील यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. ही तक्रार भाजपने नेत्याने केली आहे. कंपनी शेअरमध्ये भागीदारी रक्कम अदा न केल्याचा भाजप पदाधिकाऱ्याकडून आरोप केला आहे.
हे ही वाचा : धाराशिव-जळगाव महामार्गावर गाड्या बंद पाडून लुटणारी टोळी अखेर गजाआड, पोलिसांनी 'असा' रचला सापळा
रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा
माजी मंत्री केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे तक्रार करणारे उद्योजक भाजपचेच पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी कैलास अहिरे असे तक्रादाराचे नाव आहे.
तक्रारदार कैलास अहिरे यांच्या एन व्ही ऑटो स्पेअर्स या कंपनीच्या शेअर्समध्ये भागीदारी करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या रक्कमेपैकी सुमारे दहा कोटींची रक्कम न देताच कंपनीते शेअर्स परस्पर नावावर करून घेत सापूर येथील उद्योजक कैलास अहिरे यांची तब्बल 10 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 316/5 , 318/4 व 3/5 नुसार विश्वासघात यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी संबंधित प्रकरणात गुन्ह्याचा अधिकचा तपास सुरु ठेवला आहे.
10 कोटी रुपयांची रक्कम न दिल्याचा गंभीर आरोप
या प्रकरणात उद्योजक कैलास अहिरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, अहिरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून त्यांचे नातू आणि इतर काही लोकांना उद्योगात भागीदार घेतल्याचा आरोप केला. कैलास आहेर यांनी 14 टक्के कंपनीचे शेअर्स दानवे यांच्या सांगण्यावरून शिवम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. या शेअर्सच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता. मात्र, त्यापैकी 10 कोटी रुपयांची रक्कम देण्यात न आल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणातील सहभागी आरोपी दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील , गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीरा, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धिरेंद्र प्रसाद, मंदार टाकळकर यांचा यात समावेश होतो.










