पंढरपूर पोटनिवडणूक पुन्हा घ्या, राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंढरपूर: राज्यात सत्ता असताना देखील पंढरपूर पोटनिवडणुकीत (pandharpur by-election) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पण आता हीच पोटनिवडणूक पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे. ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलचे अॅड. नितीन माने यांनी निवडणूक आयोगाला त्यासंबंधी पत्र लिहून निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांवर दबाव टाकण्यात आला आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

यावेळी असा आरोप करण्यात आला आहे की, ‘विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांनी अनेकांना आपल्या कारखान्यातच डांबून ठेवलं होतं. तसंच भाजपला मतदान न केल्यास कामावरुन काढून टाकू’ अशी धमकी देखील देण्यात आल्याचा आरोप आता राष्ट्रवादीच्या लीगल सेलकडून करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

यामुळेच पंढरपूर-मंगळवेढा येथे पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून आता झालेल्या निवडणुकीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या लीगल सेलने याबाबतचं पत्र निवडणूक आयोगाला पाठवलंच आहे. पण त्यासोबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील हे पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आता या संपूर्ण मागणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके का हरले आणि भाजपचे समाधान आवताडे का जिंकले वाचा कारणं

ADVERTISEMENT

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा नेमका निकाल काय?

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत अटीतटीची ठरली. पण या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी अखेरच्या क्षणी विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांचा जवळजवळ 3733 मतांनी विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला.

यंदा कोरोनाच्या महामारीमुळे कोरोना नियमांचे पालन करीत अतिशय काटेकोरपणे ही मतमोजणी पार पडली होती. यावेळी तब्बल 38 फेऱ्यांनंतर या निवडणुकीचा निकाल हाती आला. दरम्यान, या विजयामुळे भाजपची राज्यातील ताकद आणखी वाढली आहे.

Pandharpur By Election : भाजपने जुळवलं बेरजेचं गणित, या फॅक्टरचा महाविकास आघाडीला फटका

पंढरपूरच्या अंतिम आकडेवारीनुसार भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे 1 लाख 9 हजार 451 मतं मिळवून विजयी झाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी देखील तब्बल 1 लाख 5 हजार 717 मतं मिळवली. त्यामुळे अवघ्या 3733 मतांनी समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक घेणण्यात आली होती. येथे 17 एप्रिलला मतदान पार पडलं होतं. तर 2 मे रोजी मतमोजणी पार पडली. ज्यामध्ये भाजपने विजय मिळवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT