Viral Video : सिंहाच्या पिंजऱ्यात पर्यटकाने हात घातला, वनराजाने घडवली जन्माची अद्दल

मुंबई तक

सिंह हा जंगलचा राजा, तो पिंजऱ्यात असला तरीही त्याचा रूबाब पाहण्यासारखाच असतो. पिंजऱ्यातल्या सिंहाकडे पाहतानाही अनेकांची भीतीने गाळण उडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्या व्हीडिओत एक पर्यटक सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालताना दिसतो आहे. सिंहच तो.. तो काय गप्प बसणार का? त्याने या पर्यटकाला जन्माची अद्दल घडवली आहे. काय आहे व्हीडिओ? […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सिंह हा जंगलचा राजा, तो पिंजऱ्यात असला तरीही त्याचा रूबाब पाहण्यासारखाच असतो. पिंजऱ्यातल्या सिंहाकडे पाहतानाही अनेकांची भीतीने गाळण उडते. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्या व्हीडिओत एक पर्यटक सिंहाच्या पिंजऱ्यात हात घालताना दिसतो आहे. सिंहच तो.. तो काय गप्प बसणार का? त्याने या पर्यटकाला जन्माची अद्दल घडवली आहे.

काय आहे व्हीडिओ?

हा व्हीडिओ अफ्रिकेतल्या प्राणी संग्रहालयतला आहे. या प्राणी संग्रहालयाला अनेक पर्यटक भेट देत असतात. एक अतिउत्साही पर्यटक सिंहाला पाहून त्याची थट्टा करू लागला. एवढंच नाही तर त्याने सिंहाच्या पिंजऱ्यात हातही घातला. आधी त्याने सिंहाला गोंजारलं. त्यावेळी सिंह काही सेकंद शांत उभा राहिला. त्यानंतर या उत्साही पर्यटकाने थेट सिंहाच्या तोंडात हात घातला. झालं सिंह इतका चिडला की त्याने या पर्यटकाची बोटं आपल्या दातांमध्ये घट्ट पकडली. काय झालं आहे आपल्यासोबत या संकटाची कल्पना पर्यटकाला आली म्हणून त्याने हात सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. सिंहाने त्याचा हात सोडला पण या सगळ्या झटापटीत सिंहाने पर्यटकाची बोटं तोडली.

अकोला : वाघाच्या भीतीने उडाली गावकऱ्यांची झोप, वनविभागाचं पथक सतर्क

हे वाचलं का?

    follow whatsapp