अपर्णा सेन यांच्या ‘The Rapist’ या सिनेमाची इतकी चर्चा का होते आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दिग्गज अभिनेत्री आणि सिनेदिग्दर्शक अपर्णा सेन यांनी त्यांच्या करिअरमधला तिसरा हिंदी सिनेमा तयार केला आहे. या सिनेमाचं नाव आहे The Rapist. या सिनेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते आहे. याचं कारण हा सिनेमा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रीमियरसाठी निवडला गेला आहे. एवढंच नाही तर जी सिओक अवॉर्डसाठीही नॉमिनेट झाला आहे. BIFF ने प्रीमियर होण्याआधी द रेपिस्ट या सिनेमाचा एक ऑफिशियल ट्रेलर रिलिज केला आहे.

द रेपिस्टची गोष्ट दोन महिलांविषयीची आहे. थंडी पडलेली असताना एका रात्री या दोघी बाहेर असतात. तिथे दोन मुलं बाईवरून येऊन या दोघींची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. या महिला त्यांना मुलंच आहेत असं समजून ओरडतात आणि तिथून जायला सांगतात. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना एका निर्जन भागात दोन महिला बेशुद्ध अवस्थेत सापडतात. त्या महिलांच्या जवळ त्यांची अंतर्वस्त्रही पडलेली असतात. चौकशी केल्यावर पोलिसांना हे समजायला वेळ लागत नाही की हे सगळं प्रकरण बलात्काराचं आहे.

सिनेमाचा ट्रेलर

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या महिलांसोबत गैरवर्तन करणारा मुलगा पकडला जातो. पोलीस त्याला फक्त चुकीची वागणूक देतात असं नाही तर त्याची खिल्लीही उडवतात. दुसरीकडे या भयंकर अनुभवातून गेलेली एक महिला क्रिमनिल सायकॉलॉजी म्हणजेच गुन्हेगारांचं मानसशास्त्र हा विषय शिकवणारी प्राध्यापक आहे. या महिलेचं सगळं आयुष्यच या प्रसंगाने बदलून जातं. मात्र तरीही तिला हे जाणून घ्यायचं असतं की अशी काय मानसिकता आहे ज्यामुळे एक साधासरळ वाटणारा मुलगा, रेपिस्ट झाला. तिचा हा शोध तिला कुठे घेऊन जातो यावर हा सिनेमा भाष्य करतो.

द रेपिस्ट या सिनेमाचा ट्रेलर पाहिला तर तो अतिरंजित न वाटता शांत वाटतो. त्यातून फार काही जाणवत नाही. मात्र एक खरं आहे की हा ट्रेलर पाहिल्यावर आपण विचारात नक्की पडतो. या ट्रेलरमध्ये बलात्कार झालेली महिला जो विचार करते आहे तोच विचार प्रेक्षक म्हणून आपणही करू लागतो. मात्र ट्रेलर पाहून नेमकं कसं व्यक्त व्हावं हे आपल्यालाही नीट कळत नाही. कारण हा ट्रेलर नेहमीसारखा नाही. यातून सिनेमात काय असेल हे सांगता येणं कठीण आहे. हा सिनेमा फक्त बलात्काराच्या शिकार झालेल्या महिलांविषयी नाही तर त्या लोकांविषयीही आहे जे अशा प्रकारे वागतात, बलात्कारासारखं घृणास्पद कृत्य करतात. हा सिनेमा बलात्कारासारखा गंभीर गुन्हा करणाऱ्यांची सायकॉलॉजी काय असेल यावर बेतलेला आहे हे ट्रेलर पाहून कळतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

The Rapist हा सिनेमा दिग्दर्शिक केला आहे अपर्णा सेन यांनी. अपर्णा सेन यांनी बंगाली भाषेत सिनेमा करण्याची सुरूवात अभिनेत्री म्हणून केली होती. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये सत्यजीत रे, मृणाल सेन यांच्या सहीत अनेक दिग्गज सिनेदिग्दर्शकांसोबत काम केलं. 1981 मध्ये अपर्णा सेन यांनी 36 चौरंगी लेन या सिनेमापासून आपलं दिग्दर्शन सुरू केलं. हा सिनेमा ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी प्रोड्युस केला होता. अपर्णा सेन यांनी त्यांच्या कारकिर्दीत 15 सिनेमा दिग्दर्शित केले आहेत. आपल्या या सिनेमांसाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये त्यांना 9 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कला क्षेत्रात असलेलं त्यांचं प्रचंड योगदान पाहून 1987 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.

द रेपिस्ट हा अपर्णा सेन यांनी दिग्दर्शित केलेला तिसरा हिंदी सिनेमा आहे. याआधी त्यांनी सोनाटा आणि सारी रात हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. द रेपिस्ट हा सिनेमा का तयार करावासा वाटला? याबाबत अपर्णा सेन यांनी व्हरायटी या वेब पोर्टलसोबत चर्चा करताना सांगितलं की हा सिनेमा दिग्दर्शित करावा हे मागच्या 15 वर्षांपूर्वी डोक्यात आलं होतं. तेव्हा हा सिनेमा काही कारणाने करायचा राहिला.

गेल्या काही दिवसांपासून देशात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मी ठरवलं आता आपण हा सिनेमा तयार करायचा. कुणीही जन्मतः रेपिस्ट नसतो. तरीही माणसं बलात्कारासारखं घृणास्पद कृत्य का करतात? याचा शोध अपर्णा सेन यांना घ्यायचा होता. एखाद्या माणसाची मानसिकता अशी घडते त्यात समाजाची नेमकी भूमिका असते? समाजाने त्याच्यासोबत भेदभाव केला का? त्याच्यासोबत काय काय घडलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याच्या दृष्टीकोनातून हा सिनेमा तयार केला आहे असं अपर्णा यांनी सांगितलं.

या प्रश्नांची सिनेमात उत्तरं शोधण्याचा मी माझ्या परिने प्रयत्न केला आहे. सिनेमा तयार झाल्यानंतरही मला या सगळ्या प्रश्नांची ठोस उत्तरं मिळालेली नाहीत. मात्र द रेपिस्ट हा सिनेमा साकारून निदान मला या प्रश्नांचा शोध घेता आला.

द रेपिस्ट या सिनेमात क्रिमिनल सायकॉलॉजीच्या प्राध्यापकाची भूमिका अपर्णा सेन यांची मुलगी आणि अभिनेत्री कोंकणा सेनने केला आहे. त्याबाबत विचारलं असता अपर्णा म्हणाल्या, माझी मुलगी आहे म्हणून तिला मी ही भूमिका दिलेली नाही. एक अभिनेत्री म्हणून तिची भूमिका समजून घेण्याची वृत्ती आणि कोणत्याही विषयाकडे बघण्याचा असलेला एक वेगळा दृष्टीकोन म्हणून कोंकणाला या सिनेमात निवडलंय. कोंकणाच्या पतीची म्हणजेच आफताब मलिकची भूमिका अभिनेता अर्जुन रामपालने साकारली आहे. अर्जुनचं पात्र अशासाठी आवश्यक आहे की एका महिलेवर बलात्कार होतो त्यानंतर तिचा पती तिच्याशी कसा वागतो. या दोघांवर या घटनेचा काय परिणाम होतो.

या सिनेमातली द रेपिस्टची भूमिका साकारली आहे ती तन्मय धनानियाने. तन्मयचं काम अपर्णा सेन यांनी रॉनी सेन दिग्दर्शित कॅट सिक्समध्ये पाहिलं होतं त्यानंतर त्याला ही भूमिका देण्यात आला. कॅट सिक्समध्ये तन्मयने एका ड्रग्ज अॅडिक्ट मुलाची भूमिका साकारली होती.

द रेपिस्ट हा सिनेमा बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. 7 ऑक्टोबरला हा सिनेमा दाखवला जाईल. अॅप्लॉज एंटरटेंनमेंटनी क्वेस्ट फिल्म्स सोबत येऊन या सिनेमाची निर्मिती केली आहे. अॅप्लॉज एंटरटेंनमेंट या प्रॉडक्शन कंपनीने आत्तापर्यंत क्रिमिनल जस्टिस, सिटी ऑफ ड्रीम्स, स्कॅम 1992 या हिट वेब सीरिज दिल्या आहेत. आता त्यांच्याच प्रॉडक्शन हाऊस मधून द रेपिस्ट हा सिनेमाही येणार आहे. हा सिनेमा भारतात कधी रिलिज होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र सिनेमा जेव्हा रिलिज होईल तेव्हा तो OTT वरच रिलिज केला जाईल असं निर्माते सांगत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT