SPG जवानांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरण्यास सांगितले, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकदिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना देहुच्या कार्यक्रमात भाषण करु न दिल्याने वाद पेटलेला असतानाच मुंबईमध्ये आदित्या ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरण्यासाठी सांगण्यात आले.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा एक भाग असलेल्या SPG जवानांनी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीतून उतरण्यास सांगितले. दोन कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी शहरात येणारे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी ठाकरे आयएनएस शिक्रा येथे गेले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार एसपीजीने लक्षात आणून दिले की, आयएनएस शिक्रा तळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करणाऱ्या व्हीआयपींच्या यादीत आदित्य ठाकरेंचे नाव नव्हेत. एसपीजीच्या या वागणुकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंने नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री जवानांना म्हणाले की आदित्य केवळ त्यांचा मुलगा म्हणून नाही तर प्रोटोकॉल मंत्री म्हणून आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

“अजित पवार हे पालकमंत्री आहेत आणि पंतप्रधानांचाच प्रोटोकॉल त्यांना लागू असतो. त्यामुळे त्यांना हजर राहणे आवश्यक असतं. केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात पंतप्रधान येणार असतील, तर पालकमंत्र्यांना जावं लागतं. अजित पवार तिथं जाणं योग्यचं आहे. पण, तिथं बोलायला दिलं नसेल, तर मला ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे ते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांचं भाषण असायला हवं होतं,” असं ते म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT