Maharashtra Politics: ‘त्या’ तीन भेटी ज्याने अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळतंय!
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Government) अस्तित्वात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या सरकारच्या स्थिरतेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तीन पक्षांचं मिळून बनवलेलं हे सरकार कधीही कोसळू शकतं असं विरोधी पक्षाकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या मते या सरकारला पाच वर्ष कोणताही धोका नाही. मात्र, मागील काही दिवसातील तीन […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Government) अस्तित्वात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून या सरकारच्या स्थिरतेबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तीन पक्षांचं मिळून बनवलेलं हे सरकार कधीही कोसळू शकतं असं विरोधी पक्षाकडून वारंवार सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या मते या सरकारला पाच वर्ष कोणताही धोका नाही.
ADVERTISEMENT
मात्र, मागील काही दिवसातील तीन भेटींमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण हे अक्षरश: ढवळून निघालं आहे. ज्याचे पडसाद राजकीय वर्तुळात आजही उमटत आहेत.
कोणत्या तीन भेटींची महाराष्ट्राच्या आजही सुरु आहे चर्चा?
हे वाचलं का?
2019 विधानसभा निवडणुकीनंतर (2019 Vidhansabha Eelection) महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेने (Shiv Sena) भाजपची (BJP) साथ सोडत अनेक वर्ष राजकीय शत्रुत्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय समीकरणं बदलली.
Shiv Sena-NCP: मुख्यमंत्र्यांचा कोणता निरोप घेऊन संजय राऊत पोहचले शरद पवारांच्या भेटीला?
ADVERTISEMENT
जेव्हा हे सरकार अस्तित्वात आलं तेव्हा ते सहा महिने देखील टिकणार नाही असं भाजपकडून (BJP) सातत्याने सांगण्यात येत होतं. मात्र, आता या सरकारला दीड वर्षांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे.
ADVERTISEMENT
पण असं असलं तरी महाविकास आघाडीसरकारबाबत सातत्याने वेगवेगळ्या चर्चा समोर येत असतात. त्यामुळे हे सरकार स्थिर नाही असं विरोधकही सतत म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. त्यातच तीन भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना सतत उधाण येत आहे.
पहिली भेट: 27 मार्च 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुजरातमधील अहमदाबादमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अक्षरश: ढवळून निघालं होतं. कारण ही भेट अत्यंत गुप्त पद्धतीने झाली असल्याचं सांगण्यात येत होतं.
या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युती करणार का? या चर्चांना देखील प्रचंड उधाण आलं होतं. दुसरीकडे याच भेटीबाबत अमित शाह यांनी सूचक विधान केलं होतं. त्यामुळे सर्वांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.
मात्र, राष्ट्रवादीकडून अशी कोणतीही भेट नसल्याचं सांगण्यात येत होते. पण पवार हे अहमदाबादला गेले होते आणि त्यांनी तेथील उद्योगपती अदानींशी भेट घेतली असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे ही भेट अद्यापही कथित भेट असल्याचं बोललं जात आहे. पण असं असलं तरीही या भेटीच्या चर्चेमुळे देखील महाराष्ट्रात आजही उलटसुलट चर्चा सुरु आहे.
शरद पवारांची अहमदाबादमध्ये अमित शाह यांच्याशी शनिवारी भेट? जाणून घ्या नेमकं काय घडलं
दुसरी भेट: 31 मे 2021 रोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात का? अशीही चर्चाही सुरु झाली होती.
खरं तर आपल्या महाराष्ट्रात अशी राजकीय परंपरा राहिली आहे की, वैर हे राजकीय असावं वैयक्तिक नसावं. याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली असू शकते. पण या भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
दरम्यान, या भेटीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काळजी वाढविणारी ठरु शकते. त्यामुळे ही भेट उद्धव ठाकरेंवर प्रेशर वाढविण्यासाठी देखील असू शकते असा अर्थ अनेक राजकीय तज्ज्ञांकडून काढण्यात येत होता. यामुळे या भेटीची अद्यापही चर्चा सुरुच आहे.
या ‘भेटी’मागे दडलंय काय…? शरद पवार-फडणवीस भेटीमागचे साडेतीन अर्थ!
तिसरी भेट: 8 मे 2021 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. पण या अधिकृत भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची बंद दाराआड जवळजवळ 40 मिनिटं चर्चा झाली होती.
याच भेटीमुळे राज्यातील राजकारणात प्रचंड खळबळ माजली होती. या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणला होता. या भेटीमुळे अशीही चर्चा सुरु झाली आहे की, शिवसेना आणि भाजप हे पुन्हा एकत्र येऊ शकतात का? यामुळे ही तिसरी भेटीही अद्याप चर्चेत आहे.
Uddhav Thackeray आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच – संजय राऊत
सध्या महाराष्ट्राचं राजकारण हे एका वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपलं आहे. अशावेळी या तीन भेटी खूपच महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या भेटींचे नेमके परिणाम काय आहेत हे आज घडीला दिसत नसले तरीही येत्या काळात त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT