पिंपरीत 14 देशी पिस्तुलं आणि 8 गोळ्यांसह तीन दरोडेखोर गजाआड
समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने 14 देशी पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसांसह तिघांना ताब्यात घेतले आहे पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत असलेल्या चरोली वडमुखवाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी या टोळीवर कारवाई करत तिघांना जेरबंद केले आहे तर त्यांचे इतर दोन साथीदार हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत त्यांचा […]
ADVERTISEMENT

समीर शेख, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने 14 देशी पिस्तुलं आणि 8 जिवंत काडतुसांसह तिघांना ताब्यात घेतले आहे पिंपरी-चिंचवड शहराच्या लगत असलेल्या चरोली वडमुखवाडी परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी या टोळीवर कारवाई करत तिघांना जेरबंद केले आहे तर त्यांचे इतर दोन साथीदार हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या गुन्ह्याविषयी मिळालेल्या माहिती अनुसार आकाश अनिल मिसाळ, रुपेश सुरेश पाटील आणि रितिक दिलीप तापकीर अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तर त्यांच्या फरार झालेल्या दोन साथीदारांच्या मागावर आता पोलीस आहेत. दरोडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी सागर शेंडगे हे वडमुखवाडी परिसरात पेट्रोलिंग करत असतानाच त्यांना या टोळीच्या सदस्यांवर संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
त्यानंतर दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आपल्या टीमसह संबंधित ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी वरील या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर ही महत्त्वाची माहिती या आरोपींनी पोलिसांना सांगितली की या व्यतिरिक्त 12 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 6 काडतुसेही त्यांच्याकडे आहेत त्यानंतर पोलिसांनी एकूण 14 देशी बनावटीचे पिस्तुले आणि 8 जिवंत काडतुसं या आरोपींकडून जप्त केली