टीकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या, राज्याचे मंत्री अडचणीत?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीडच्या परळी भागातील टीकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. २२ वर्षीय पुजा चव्हाणने काही दिवसांपूर्वी पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी विदर्भातील एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु आहे. याप्रकरणातील काही ऑडीओ क्लिप्सही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. याप्रकरणात राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑडीओ क्लिपची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारं पत्र राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहीलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींचं बंजारा भाषेत संभाषण आहे. ज्यामध्ये एक तरुणी ही आत्महत्येचा विचार करतेय असं संभाषण आहे. या ऑडीओ क्लिपमध्ये जो आवाज मंत्र्याचा असल्याचा दावा केला जातोय…या व्यक्ती नेमक्या कोण आहेत? या चर्चांना सध्या उधाण आलंय. या ऑडीओ क्लिपचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच याची सत्यता समोर येईल, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

या ऑडीओ क्लिपमध्ये नेमकं आहे तरी काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तरुणीच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचं सांगत आहे. ज्यावर दुसरी व्यक्ती तिला समजावून सांगा…डॉक्टरकडे घेऊन जा असं सांगताना ऐकायला येतंय. यानंतर फोनवरील दुसरी व्यक्ती ही संबंधित व्यक्तीला, तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाऊन येते पण नंतर मी आत्महत्या करेन असं तरुणी म्हणत असल्याचं सांगताना ऐकायला येतंय.

दरम्यान या दोन्ही व्यक्तींमध्ये बंजारा भाषेतील संवादाची एक ऑडीओ क्लिपही व्हायरल झाली असून ज्यात तरुणीने आत्महत्या केल्यानंतर एक व्यक्ती तिकडेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील व्यक्ती तिचा मोबाईल काढून घे असं सांगताना ऐकायला येत आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या प्रकरणावरुन विरोधी पक्षातील भाजपने महाविकास आघाडी सरकारला चांगलंच कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी ऑडीओ क्लिपच्या चौकशीची मागणी केल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणात लक्ष घालून चौकशीचे आदेश द्यावेत नाहीतर जनतेचा विश्वास उडेल. पोलिसांनी याप्रकरणी संबंधित मुलीचा लॅपटॉप का तपासला नाही असं विचारत पुणे पोलिसांनी याप्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करावा असंही पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT