महाराष्ट्रामध्ये लॉकडाउनच ! खासगी कार्यालयं-हॉटेल ते लग्नसोहळ्यांसाठी कडक निर्बंध लागू

मुंबई तक

हमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिनी लॉकडाउनची घोषणा केली. वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने Break the Chain या उपक्रमाअंतर्गत नवीन नियम व निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी लॉकडाउन लावायचा की नाही या विषयावरुन बराच उहापोह सुरु होता. सरकारमध्येही काही मंत्र्यांचं मत हे लॉकडाउन लावण्यासाठी सकारात्मक होतं तर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

हमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिनी लॉकडाउनची घोषणा केली. वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने Break the Chain या उपक्रमाअंतर्गत नवीन नियम व निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी लॉकडाउन लावायचा की नाही या विषयावरुन बराच उहापोह सुरु होता. सरकारमध्येही काही मंत्र्यांचं मत हे लॉकडाउन लावण्यासाठी सकारात्मक होतं तर काहींचा या निर्णयाला विरोध होता. रविवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीतही राज्य सरकारने लॉकडाउनची तयारी केली होती. परंतू लोकांमध्ये तयार झालेल्या संभ्रमांचं आणि भीतीचं वातावरण पाहता सरकारने लॉकडाउन हा शब्द न वापरता खासगी कार्यालयांपासून हॉटेल व्यवसायिकांपर्यंत ते थेट हाऊसिंग सोसायट्या आणि लग्नसोहळ्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.

हे नियम नीट बारकाईने वाचले की आपल्यालाही कळेल की राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनचीच घोषणा केली आहे.

  • राज्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील, तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.

  • अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व दुकानं, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल्स बंद राहणार

  • हे वाचलं का?

      follow whatsapp