दिशा, निकिता आणि शांतनू यांनी तयार केलं टूलकिट-दिल्ली पोलीस
शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिटचं प्रकरण आता राजकीय झालं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पर्यावरणाशी संबंधित कार्यकर्ती दिशा रविला बंगळुरूहून अटक केली. या अटकेनंतर सत्ताधारी पक्षावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुला गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहीत अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. तर दिल्ली पोलीस हे आता दिशाला टूल किट तयार […]
ADVERTISEMENT
शेतकरी आंदोलनाशी संबंधित टूलकिटचं प्रकरण आता राजकीय झालं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पर्यावरणाशी संबंधित कार्यकर्ती दिशा रविला बंगळुरूहून अटक केली. या अटकेनंतर सत्ताधारी पक्षावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुला गांधी, प्रियंका गांधी यांच्यासहीत अनेक नेत्यांनी या प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. तर दिल्ली पोलीस हे आता दिशाला टूल किट तयार करण्यासाठी कोणी साथ दिली त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
A woman named Puneet who is based in Canada connected these people to the Pro-Khalistani Poetic Justice Foundation. On 11th January Nikita and Shantanu attended a Zoom meeting organised by Poetic Justice Foundation in which modalities were chalked out: Prem Nath, Jt CP Cyber Cell pic.twitter.com/BgL0cr9uXs
— ANI (@ANI) February 15, 2021
दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी टूलकिट प्रकरणात महत्त्वाची माहिती दिली आहे. 11 जानेवारीला या संदर्भातली झूम मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये दिशा, निकिता आणि शांतनू हे तिघे जण सहभागी झाले होते. 26 जानेवारीच्या आधी ट्विटर स्ट्रोम निर्माण करायचं असा ठराव या मिटिंगमध्ये झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या झूम मिटिंगमध्ये 60 ते 70 जण सहभागी झाले होते. टूलकिट प्रकरणा पोएटिक फाऊंडेशनचाही हात असल्याची बाब दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केली. जानेवारी महिन्यातच टूलकिट तयार कऱण्यात आलं. ज्यामागे आंदोलन सोशल मीडियावर पसरेल आणि जगभरात जाईल असा हेतू होता.
हे वाचलं का?
दिल्ली पोलिसांनी आणखी काय म्हटलं आहे?
देशातलं वातावरण बिघडवण्यासाठी जे टूलकिट तयार करण्यात आलं त्याची मुख्य सूत्रधार दिशा रवि आहे.
ADVERTISEMENT
पर्यावरणासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने टूलकिट ट्विट केलं होतं आणि त्यानंतर ते डिलिटही केलं होतं. दिशा रविने ते टूलकिट एडिट केलं होतं.
ADVERTISEMENT
कोर्टात सुनावणीच्या दरम्यान दिशाला रडू कोसळलं तिने या गोष्टीची कबुली दिली होती की तिने 2 ओळी एडिट केल्या होत्या.
पोलिसांनी दिशाचा मोबाईल जप्त केला आहे, मात्र या मोबाईलमधला डेटा आधीच डिलिट करण्यात आला आहे हा डेटा आता पोलीस रिट्राईव्ह करणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना खलिस्तानी अँगल मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खलिस्तानी ग्रुपला पुन्हा उभं करण्यासाठी रचण्यात आलेला हा कट आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा आणि टूलकिटशी संबंधित असलेले लोक हे पोएटिक जस्टिस फाऊंडेशनचे के धालीवाल यांच्या संपर्कात होते. दिशाने धालीवाल किंवा पोएटिक जस्टिस फाऊंडेशनशी माझा काहीही संबंध नाही असं म्हटलं आहे.
दिशाला अटक करण्यात आल्यानंतर आता पोलिसांना निकिता आणि शांतनू यांचा शोध घेत आहेत. दिशा रविने टूलकिट तयार करण्यासाठी What’s App ग्रुप तयार केला होता. या ग्रुपवर हे दोघेही होते. त्यामुळे आता त्यांना या प्रकरणात काय काय माहित आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT