आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाताय?; थांबा! आधी नियम तर वाचा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– गणेश जाधव

ADVERTISEMENT

गणेशोत्सवानंतर वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्रीच्या काळातील भक्तिमय वातावरण असते, तर महाराष्ट्रातील विविध देवींच्या दर्शनासाठीही लोक घराबाहेर पडतात. मात्र, गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही भाविकांना दर्शनापासून वंचित राहावं लागणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठीही भाविकांची प्रचंड गर्दी असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली जारी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दररोज 60 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, तर नवरात्र काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी असणार आहे. या काळात तुळजापूर येथे संचारबंदी आदेश लागू असणार आहेत. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातून नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात, त्यामुळे या 3 दिवसात एकही वाहन वा भाविकाला जिल्ह्यात येऊ दिलं जाणार नाही.

हे वाचलं का?

पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पौर्णिमेच्या दिवशी व पौर्णिमेनंतर एक दिवस, असं तीन दिवस तुळजापुरात संचारबंदी राहील तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यां कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

आई राजा उदोऽऽ उदोऽऽ तुळजापूर सजलं; पहा डोळे दिपवून टाकणारी दृश्य

ADVERTISEMENT

कुणाला प्रवेश असणार… कुणाला नसणार?

ADVERTISEMENT

आई तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षाच्यावरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालकं यांना प्रवेश दिला जाणार नाही.

ज्या भाविकांनी कोरोना लसीचे 2 डोस पूर्ण केले आहेत त्यांनाच नवरात्र काळात मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा 29 सप्टेंबर रोजी होणार असून, 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या काळात देवीचा नवरात्र उत्सव होणार आहे. त्यात 7 ऑक्टोबर म्हणजे घटस्थापना दिवसापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत परिसरात सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असं आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केलं आहे.

आई तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी व परिसरात कोरोना नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे. सॅनिटायझर,मास्क, सोशल डिस्टन्स हे नियम पाळावे लागतील. दरम्यान, पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांबरोबरच संबंधित प्रशासकीय अधिकारी, मंदिर संस्थानशी संबंधित कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.

उस्मानाबाद : नवरात्र उत्सवात भक्तांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाहीच, सर्व धार्मिक विधी पंरपरेनुसार होणार

नवरात्र महोत्सव काळातील यात्रा बंदी असली, तरी पुजारी, सेवेकरी आणि मानकऱ्यांकडून करण्यात येणारी पूजा आणि इतर विधी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. आवश्यक त्या सर्व प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने वाहतुकीचे व्यवस्थापन, बॅरिकेटींग, सुरक्षा, आरोग्य विषयी बाबींवर अधिक भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

या महोत्सवानिमित्त वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशांचे आणि सूचनांचे संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंर्तगत कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही दिवेगावकर यांनी दिलेला आहे.

असा होणार शारदीय नवरात्री उत्सव…

शारदीय नवरात्र महोत्सवास २९ सप्टेंबर रोजी मंचकी निद्राने सुरुवात होईल. या काळात देवीची मूर्ती शेजघरात निद्रेसाठी ठेवली जाते. ७ ऑक्टोंबर रोजी देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापनाकरून घटस्थापना होईल. 8 ऑक्टोंबर रोजी श्री देवीची नित्‍योपचार पूजा व रात्री छबीना, 9 ऑक्टोंबर रोजी रथअलंकार महापूजा, 10 ऑक्टोंबर रोजी ललित पंचमी असल्याने मुरली अलंकार महापूजा, 11 ऑक्टोंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा.

12 ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, 13 ऑक्टोबरला महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा,14 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना व 15 रोजी विजयादशमी दसरा असल्याने पहाटे सिमोल्लंघन विधी पार पडेल. त्यांनतर १९ ऑक्टोबर रोजी मंगळवारी कोजागिरी पोर्णिमानंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने अन्नदान अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT