साताऱ्यात थरकाप उडवणारा अपघात; कारचा चक्काचूर, दोन युवक जागीच ठार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा जिल्ह्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील दहिवडी येथे झालेल्या स्विफ्ट कार आणि ट्रकच्या भयंकर अपघातात दहिवडीतील दोन युवक जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयतांपैकी एकजण अवघ्या सोळा वर्षांचा आहे. मंगळवारी (30 नोव्हेंबर) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ADVERTISEMENT

दहिवडीतील पियूष शैलेंद्र खरात (वय 22), स्वयंम सुशिल खरात (वय 16) आणि अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटणहून दहिवडीला येत होते. त्याचवेळी एक ट्रक दहिवडीच्या दिशेकडून फलटणच्या दिशेने चालला होता.

पुणे : एकाच कुटुंबातील सहा जणांना वाहनाने चिरडले; तिघे जागीच ठार, अल्पवयीन मुलांचा समावेश

हे वाचलं का?

दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील वळणावर ही दोन्ही वाहनं अचानक समोरासमोर आली आणि भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला, तर कारला धडकलेला ट्रक उलटून रस्त्याच्या बाजूला पडला.

पुणे : एकाच कुटुंबातील सहा जणांना वाहनाने चिरडले; तिघे जागीच ठार, अल्पवयीन मुलांचा समावेश

ADVERTISEMENT

या अपघातात पियुष आणि स्वयंम हे दोघे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघात दोन्ही वाहनं वेगात असल्यानं झाला की वाहनांवरील चालकांचं नियंत्रण सुटल्यानं झाला, हे मात्र, कळू शकलं नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT