मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या दोन चुकांमुळे USSR चे झाले होते 15 तुकडे…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोव्हिएत युनियनचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. गोर्बाचेव्ह बराच काळ आजाराशी झुंज देत होते. गोर्बाचेव्ह तेच अध्यक्ष आहेत ज्यांनी रक्त न सांडता शीतयुद्ध संपवले होते. दुस-या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात शीतयुद्ध अनेक वर्ष सुरू होते. एकीकडे त्यांना शीतयुद्ध संपवण्याचा मानही मिळाला तर दुसरीकडे सोव्हिएत युनियनचे विघटन रोखू न शकल्याने त्यांना टीका झाली होती. मिखाईल गोर्बाचेव्ह हे असे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांना सुधारणा करायची होती. परंतु प्रत्यक्षात ते स्वतःच्या सत्तेची कबर खोदत होते. गोर्बाचेव्ह यांच्यासमोरच सोव्हिएत युनियनचे विघटन झाले होते.

ADVERTISEMENT

सोव्हिएत युनियनचा गौरवशाली इतिहास

तो सोव्हिएत युनियन, ज्याने अॅडॉल्फ हिटलरचा पराभव केला. तो सोव्हिएत युनियन ज्यांनी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाशी शीतयुद्ध करून अण्वस्त्रांच्या शर्यतीत भाग घेतला. तो सोव्हिएत युनियन, ज्याने पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. अंतराळात जाणारा पहिला मानवही सोव्हिएत युनियनचा होता. त्याचे नाव होते युरी गागारिन. एकेकाळी सोव्हिएत युनियन सर्वच बाबतीत पुढे होते. पण गोर्बाचेव्ह यांच्या नजरेसमोर सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि त्यातून 15 देश निर्माण झाले.

सोव्हिएत युनियन फुटले आणि तयार झाले हे 15 देश

25 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियन फुटले. 15 नवीन देश तयार झाले – आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, एस्टोनिया, जॉर्जिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, लाटविया, लिथुआनिया, मोल्दोव्हा, रशिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन आणि उझबेकिस्तान. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकदा म्हणाले होते, सोव्हिएत युनियनच्या नावावर ‘ऐतिहासिक रशिया’चे विघटन झाले होते. आपण पूर्णपणे वेगळ्या देशात बदललो आणि आपल्या पूर्वजांनी मागच्या हजारो वर्षात जे केले होते ते विसरुन गेलो.

हे वाचलं का?

गोर्बाचेव्ह: 1931 मध्ये जन्म, 1985 मध्ये झाले राष्ट्राध्यक्ष

1917 मध्ये रशियात बोल्शेविक क्रांती झाली. या क्रांतीने झार निकोलस II ला सत्तेतून काढून टाकले आणि रशियन साम्राज्याचा अंत झाला. कामगार आणि सैनिकांनी मिळून सोव्हिएतची स्थापना केली. सोव्हिएत हा रशियन शब्द आहे, ज्याचा अर्थ सभा किंवा परिषद असा होतो. 1917 मध्ये सोव्हिएत युनियनची स्थापना झाली.

सोव्हिएत युनियनची स्थापना झाली, परंतु राजकीय अस्थिरतेचा काळ कायम राहिला. पुढे व्लादिमीर लेनिनने सत्ता स्वतःच्या हातात घेतली. 1922 मध्ये, लेनिनने रशियामध्ये दूरवरची अनेक राज्ये जोडली आणि अधिकृतपणे सोव्हिएत युनियनची स्थापना केली. रशियाने झारच्या हुकूमशाहीतून लोकशाही राष्ट्र होण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी हुकूमशाहीच प्रस्थापित झाली. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे हुकूमशहा – जोसेफ स्टॅलिन. सोव्हिएत युनियनमध्येही संसदेची स्थापना झाली, परंतु सर्व निर्णय कम्युनिस्ट पक्षाने घेतले.

ADVERTISEMENT

सोव्हिएत युनियनची स्थापना झाली. दरम्यान, 2 मार्च 1931 रोजी मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म प्रिव्होल्नॉय गावात झाला. गोर्बाचेव्ह हे स्टॅलिनला पाहत मोठे झाले. 1985 मध्ये, गोर्बाचेव्ह कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष बनले.

ADVERTISEMENT

या चुकीमुळे फुटले सोव्हिएत युनियन

गोर्बाचेव्ह अध्यक्ष झाल्यावर सोव्हिएत युनियनची अर्थव्यवस्था ढासळली होती. राजकीय संरचनाही उद्ध्वस्त झाली होती. गोर्बाचेव्ह यांना लोकशाही आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या तत्त्वांवर सोव्हिएत युनियनचे नेतृत्व करायचे होते. त्यासाठी गोर्बाचेव्ह यांनी राजकीय-आर्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरू केली.

यासाठी गोर्बाचेव्हने पेरेस्ट्रिएन्का आणि ग्लासनोस्ट अशी दोन धोरणे आणली. पेरेस्ट्रायंका म्हणजे लोकांसाठी काम करण्याचे स्वातंत्र्य आणि ग्लासनोस्ट म्हणजे राजकारण आणि अर्थव्यवस्थेतील मोकळेपणा. ज्या लोकांनी स्टॅलिनची हुकूमशाही पाहिली होती त्यांच्यासाठी हा धक्कादायक निर्णय होता. हळूहळू लोक मोकळे होऊ लागले. लोक व्यवसाय करू लागले. मालमत्ता खरेदी करण्यास सुरुवात केली. बाजारावरील सरकारचे नियंत्रण कमी झाले, त्यामुळे भावही वाढू लागले.

पण त्यामुळे भ्रष्टाचार वाढला. लाच दिल्याशिवाय कोणतेही काम झाले नाही. सरकारच्या धोरणांना लोकांनी उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली. नवी पिढी नवीन काहीतरी करेल, परदेशी गुंतवणूक येईल, देशाची सरकारी तिजोरी भरेल, असा गोर्बाचेव्ह यांचा विश्वास होता. पण लोकांचा गोर्बाचेव्ह यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला होता. आता त्यांच्या पाठीशी फार कमी लोक उभे होते. या मोकळेपणाचे कारण त्यांच्याच कम्युनिस्ट पक्षातील विरोध होता.

अशा प्रकारे फुटू लागले सोव्हिएत युनियन

मॉस्को आणि रशियन रिपब्लिकमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यामुळे साम्यवादाचा अंत झाला. ही ठिणगी हळूहळू इतर प्रजासत्ताकांपर्यंत पोहोचू लागली. बाल्टिक राज्यांतील (एस्टोनिया, लिथुआनिया आणि लॅटव्हिया) तरुणांनी स्वातंत्र्याची मागणी सुरू केली. 6 सप्टेंबर 1991 रोजी या तिन्ही देशांनी स्वत:ला स्वतंत्र घोषित केले.

हळूहळू अझरबैजान, जॉर्जिया, आर्मेनिया, युक्रेन आणि मोल्दोव्हा येथेही निदर्शने सुरू झाली. प्रत्येकाचे एकच उद्दिष्ट होते – सोव्हिएत रशियापासून वेगळे अस्तित्व. हळूहळू सर्व देश स्वतंत्र घोषित करू लागले. 21 डिसेंबर 1991 रोजी सोव्हिएत युनियनपासून विभक्त झालेल्या सर्व देशांच्या अध्यक्षांना बोलावण्यात आले आणि करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यासह, सर्व देशांना औपचारिकपणे स्वातंत्र्य मिळाले.

25 डिसेंबर 1991 च्या संध्याकाळी, गोर्बाचेव्ह स्थानिक वेळेनुसार 7.35 वाजता राष्ट्रीय टीव्हीवर दिसले. सोव्हिएत युनियनचा ध्वज क्रेमलिनमधून खाली उतरवण्यात आला आणि शेवटच्या वेळी सोव्हिएत युनियनचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. संध्याकाळी 7.45 वाजता रशियाचा ध्वज फडकवण्यात आला.

सोव्हिएत युनियनच्या विघटनाने पुतिन नाराज होते

जेव्हा सोव्हिएत युनियनचे तुकडे होत होते, तेव्हा रशियाचे विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे 39 वर्षांचे होते. त्यावेळी पुतिन केजीबीमध्ये गुप्तहेर होते. क्रेमलिनमधून सोव्हिएत युनियनचा ध्वज खाली उतरलेला पाहणे त्यांना आवडले नाही. पुतिन एकदा म्हणाले होते, ‘आमच्या पूर्वजांनी हजार वर्षात जे बांधले ते पाडून टाकले.’

गोर्बाचेव्ह यांच्या काळात शीतयुद्ध संपवण्याची मोहीम आधीच सुरू झाली होती. शीतयुद्ध संपवण्याचे श्रेयही त्यांना जाते. पण सोव्हिएत युनियन तुटल्यावर शीतयुद्ध पूर्णपणे संपुष्टात आले. कारण जग एकध्रुवीय झाले होते. आता फक्त अमेरिका ही महासत्ता उरली होती. या विघटनातून सावरण्यासाठी रशियाला दोन दशकांहून अधिक काळ लागला. पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशिया पुन्हा एकदा एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे आणि जग पुन्हा विभाजित होताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT