उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी दोन शिवसैनिक पायीच निघाले सांगलीहून मुंबईकडे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली जिल्ह्यातून दोन शिवसैनिक अजय कलगोंडा पाटील आणि अक्षय अशोक बुरुड हे मुंबई मातोश्री येथे पायी निघाले आहेत. राज्यातील शिवसेना आपल्यासोबत आहे, हा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी हे दोघे सांगलीहून पायी निघाले आहेत.सोबत भगवा झेंडा, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिमा घेऊन पदयात्रेला रवाना झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठबळ देण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला शिवसैनिक तुमच्या बरोबर आहे, आमची निष्ठा तुमच्या बरोबर आहे. आमची निष्ठा शिवसेनेबरोबर आहे आमची निष्ठा भगव्या झेंड्यावर आहे. भगव्याशी प्रतारणा कदापी होणार नाही आणि शिवसैनिकांच्यातून पक्षप्रमुखांनापाठबळाचा संदेश देण्यासाठी हे दोन शिवसैनिक आज सांगलीच्या शिवतीर्थावरून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदनकरून निघाले आहेत, अशी माहिती सांगलीचे पदाधिकारी शंभूराज काटकर यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे दोन शिवसैनिक पायी मातोश्रीवर

सांगलीच्या शिवतीर्थापासून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शिवसेना सांगली जिल्ह्याच्यावतीने अजय पाटील व अक्षय बुरुड यांना पुष्पहार घालून त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेक शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी सांगलीवाडीपर्यंत त्यांच्या सोबत पायी चालत जात शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरेंना विश्वास देण्यासाठी पायी यात्रा

‘महाराष्ट्रात जे राजकीय संघर्ष घोंगावतय. जवळच्या माणसाने हे बंड केलंय, याबाबत शिवसैनिकांना शल्य आहे. पण आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहोत’, हा विश्वास देण्यासाठी मिरज तालुक्यातील आरव गावचे शिवसैनिक मुंबईसाठी पायी रवाना होत असल्याची माहिती शंभूराज काटकर यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दररोज करणार 25 ते किमी पायी प्रवास

दोघे शिवसैनिक दररोज पायी 25 ते 30 किलोमीटर प्रवास करणार आहेत. सांगली ते उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीपर्यंतचा प्रवास हा 350 किमीपेक्षा जास्त आहे. दररोज न थांबता जर 30 किमी पायी चालल्यास 12 ते 13 दिवसात दोघे मातोश्रीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील प्रति दादा कोंडके म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसैनिक यांनी देखील सोलापूर ते मुंबई पायी यात्रा काढली होती. आता त्यानंतर सांगली जिल्ह्यातील हे दोन शिवसैनिक यांनी देखील पायी यात्रेला सुरुवात केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडापासून शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. अनेक शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेत तर अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडलीय. दोन तृतीयांश आमदार आणि खासदारांनी शिंदे गटाला आपली पसंती दिली आहे. त्यामुळे नेमकी शिवसेना कोणाची? आदेश कोणाचा मानायचा? पक्षाचा चिन्ह कोणाकडे राहील, यासाठी आता न्यायालयीन लढाई सुरु आहे. यानिर्णयाचा चेंडू आता सुप्रीम कोर्टात आहे. म्हणून न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. यादरम्यानच अशा पायी यात्रा निघत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT