भगतसिंह कोश्यारींना हटवण्यासाठी उदयनराजे करणार ‘महाराष्ट्र बंद’?
-इम्तियाज मुजावर, सातारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यपाल हटवण्याची मागणी केलेली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजेंनी पत्रकार परिषद बोलवली […]
ADVERTISEMENT
-इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यपाल हटवण्याची मागणी केलेली आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजेंनी पत्रकार परिषद बोलवली असून, यात महाराष्ट्र बंदची घोषणा केली जाऊ शकते, अशी माहिती सुत्रांनी दिलीये.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना तात्काळ राज्यपाल पदावरून हटवा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलीये.
हे वाचलं का?
उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली होती. त्यात 28 तारखेपर्यंत वाट बघू असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्याप सरकारकडून छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
‘सरकारला समजत नसेल, तर…’, संभाजीराजेंचा चढला पारा, मोदी-शिंदेंना निर्वाणीचा इशारा
ADVERTISEMENT
त्यामुळे आता उदयनराजे भोसले आज (28 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी आक्रमक झालेले उदयनराजे भोसले महाराष्ट्र बंदची हाक देण्याची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT
राज्य सरकार व केंद्र सरकारने भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी 1 डिसेंबरला महाराष्ट्र बंदची हाक उदयनराजे देणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं. उदयनराजे भोसले यांनी भाजप राहूनच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची हकालपट्टी करा! उदयनराजेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
छत्रपती संभाजीराजे यांनीही दिलाय उठाव करण्याचा इशारा
छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपालांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. ‘भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’, असं संभाजीराजेंनी म्हटलेलं आहे.
शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांची जवळीक वाढतेय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नात भाजपचे उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावली. यावेळी उदयनराजे भोसले आणि शरद पवार हे समोरासमोर आल्यानंतरचे फोटो समोर आलेत. यावेळी अजित पवार आणि उदयनराजे यांचीही भेट झाली. शरद पवार आणि अजित पवार यांना नेहमीच्या शैलीत उदयनराजे यांनी हस्तांदोलनही केलं. एकीकडे राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी आपल्याच पक्षाच्या सरकारविरोधात उदयनराजे आक्रमक झाले असताना झालेल्या या भेटीमुळे पवार आणि उदयनराजे यांची जवळीक वाढत असल्याच्या चर्चेला तोंड फुटलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT