संजय राठोडांवर उद्धव ठाकरेंची कोणतीही नाराजी नाही-फडणवीस
वन मंत्री संजय राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंची कोणतीही नाराजी नाही. संजय राठोड यांचा राजीनाम घेतला जाईल, उद्धव ठाकरे नाराज आहेत वगैरे बोललं जातंय पण हे सगळं दाखवण्याकरता आहे. नाराजी वगैरे काहीही नाही. नाराजी असती तर संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली असती. त्यांचा राजीनामा घेतला गेला असता असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे […]
ADVERTISEMENT

वन मंत्री संजय राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंची कोणतीही नाराजी नाही. संजय राठोड यांचा राजीनाम घेतला जाईल, उद्धव ठाकरे नाराज आहेत वगैरे बोललं जातंय पण हे सगळं दाखवण्याकरता आहे. नाराजी वगैरे काहीही नाही. नाराजी असती तर संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली असती. त्यांचा राजीनामा घेतला गेला असता असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात अनाचार, भ्रष्टाचार आणि दुराचार सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत असं जे बोललं जातं आहे त्या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत. या बातम्यांना काहीही अर्थ नाही. नाराजी असती तर एव्हाना कारवाई झाली असती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे छोट्या- छोट्या गोष्टींवर ट्विट करत असतात. मग संजय राठोड, पूजा चव्हाण प्रकरणावर एकही ट्विट का केलं नाही? ज्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या त्यातला आवाज कुणाचा आहे याचं उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे का नाही? कारण या सगळ्यांचं सगळं ठरलं आहे. संजय राठोड यांना अभय देण्यात आलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.