उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आमदारांची बैठक का बोलावली होती?, काय झाली चर्चा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (२२ ऑगस्ट) पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरण, चालू पावसाळी अधिवेशन आणि मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात आमदारांशी चर्चा केली. बैठकीत झालेल्या चर्चेची आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भास्कर जाधव काय म्हणाले?

मातोश्रीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. कोणत्या परिस्थितीत ते राज्याचे मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना सत्तेचा हव्यास नव्हता. खुर्चीचा कधीही लोभ नव्हता. त्यामुळे आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरीता, महिलांसाठी, पीडितांसाठी हे सरकार काय निर्णय घेत आहे. हे त्यांना जाणून घेण्यात औत्सुक्य होतं”, अशी माहिती भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर दिली.

‘तोपर्यंत शिंदे गटाकडून तेल मालीश करून घ्या’; शिंदेंवर टीकेची तोफ, फडणवीसांना शिवसेनेचं आव्हान

हे वाचलं का?

पावसाळी अधिवेशनात शिवसेनेचे आमदार जनतेची आणि शिवसेनेची भूमिका मांडताहेत का? याबद्दलची माहिती उद्धव ठाकरेंनी आमदारांकडून जाणून घेतली. आमच्याकडून राहिलेल्या उणीवा दूर करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं”, असं भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले.

एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल झाली चर्चा?

“इतक्या मोठ्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणात तारखेवर तारखा मिळत आहेत. त्याच्यावरही चर्चा झाली. मुंबई महपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा झाली. शेतकऱ्याला अधिकची मदत कशी होईल यावर भर द्या, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं”, अशी माहिती भास्कर जाधव यांनी मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीनंतर दिली.

ADVERTISEMENT

“महाप्रबोधन यात्रेसंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही आदेश दिलेला नाही. चर्चाही झाली नाही. ते नियोजन पक्षाचे जे पदाधिकारी असतात, ते करत असतात. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची लोकांप्रतीची जी बांधिलकी आहे, त्यासंदर्भात चर्चा झाली”, असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

मुंबईत गोविंदाचा मृत्यू; भास्कर जाधवांनी वाहिली श्रद्धांजली

“विलेपार्लेत गोविंदाचा दुर्दैवाने वरच्या थरावरून पडला. त्याला गंभीर जखम झाली होती. त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. आता माध्यमांतून कळलंय. शिवसेनेच्या वतीने त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करतो. हे दुःख, हा आघात पचवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना करतो”, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी शोक व्यक्त केला.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे बंडखोरांवर करणार पलटवार

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या अनेक आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. त्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर दावा ठोकण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गटातील आमदारांकडून सातत्यानं केला जात आहे.

शिंदे गटाकडून होत असलेले आरोप आणि दाव्यांना आता उद्धव ठाकरे बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन प्रत्युत्तर देणार आहेत. उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असून, हा दौरा शिवसेनेसाठी महत्त्वाचा असणार आहे.

आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी केली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार पुढे घेऊन जात असल्याचं शिंदेंसह आमदारांकडून म्हटलं जातंय. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची ही महाप्रबोधन यात्रा शिंदेंच्या अंगातून सुरू होणार आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता थेट एकनाथ शिंदेंवरच हल्लाबोल करणार असल्याचं दिसत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT